राज्य मागासवर्ग आयोग जिल्हा दौऱ्यावर

Edited by:
Published on: July 15, 2024 09:14 AM
views 136  views

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.  सोमवार दि.15 जुलैला  जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यां समवेत तिल्लोरी कुणबी, तिलोरी कुणबी जाती समुहाच्या संदर्भात बैठक होणार आहे. तसेच दि. 1 जून 2023 ते 30 जून 2024 या कालावधीत इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती या संवर्गास वितरीत केलेली जात प्रमाणपत्रे व जात वैधता प्रमाणपत्रे यांचा आढावा, जिल्ह्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अखत्यारीतील आश्रम शाळांचा आढावा, तिल्लोरी कुणबी जाती समूहाच्या प्रतिनिधीशी चर्चा व बैठक देखील संपन्न होणार आहे. ह्या बैठका जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथील सभागृह मध्ये पार पडणार आहेत. या बैठकीनंतर सायं. 4 वाजता आयोगाचे सदस्य  रत्नागिरीकडे प्रयाण करणार आहेत.