
कुडाळ : गणेश चतुर्थीच्या सणानिमित्त कुडाळ बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता, कुडाळ नगरपंचायतीने शहरातील रस्त्यांची दुरुस्ती केली आहे. अनेक दिवसांपासून रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवून ये-जा करणाऱ्या नागरिकांना आणि गणेश चतुर्थीच्या खरेदीसाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा दिला आहे.
नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या पुढाकाराने ही कामे हाती घेण्यात आली. पावसाळ्यामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडले होते. ज्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. परंतु, पावसाचे प्रमाण कमी झाल्याने खड्डे बुजवणं सोपं झालं आहे. नगरपंचायतीच्या या त्वरित कृतीमुळे गणेशोत्सवासाठी खरेदी करणाऱ्या लोकांची मोठी सोय झाली आहे.