साटम घर ते परुळेकर गल्ली पाणंद काँक्रीटीकरण कामास सुरुवात...!

Edited by:
Published on: July 31, 2023 18:00 PM
views 163  views

मालवण : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान नगरोत्थान जिल्हास्तर योजनेतून बांगीवाडा येथील साटम घर ते परुळेकर गल्ली पाणंद काँक्रीटीकरण कामास सुरवात झाली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या पाठपुराव्यातून मार्च २०२१ मध्ये या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली. प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे काम मार्गी लागत आहे.

सुमारे २२ लाख अंदाजपत्रकीय रक्कम मंजूर असलेल्या या कामाबाबत आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे यतीन खोत यांनी आभार मानले आहेत.

काही दिवसांपूर्वी हे काम सुरू होणार होते मात्र पावसामुळे हे काम थांबले होते. पावसाने काहीशी उसंत घेतल्यानंतर हे काम मार्गी लागत आहे. रविवारी स्थानिक जेष्ठ नागरिक तुरीबाळा परब यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी माजी शाखा प्रमुख हनुमंत तोंडवळकर, आबा मेस्त्री, युवतीसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख शिल्पा खोत, शिवसेना (ठाकरे गट) महिला आघाडी उपशहरप्रमुख नंदा सारंग, अनिकेत आचरेकर, सुधाकर परब, उमेश परब, एस के सावंत, विल्सन फर्नांडिस, शांती तोंडवळकर, दीपा पवार, रजिया उमर शेख, भाग्यश्री फोंडबा, दिया पवार, साक्षी पार्टी, श्वेता पार्टी, पूजा औटी यासह अन्य नागरिक उपस्थित होते.