वैभववाडीत भात खरेदीचा शुभारंभ !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 20, 2023 18:13 PM
views 212  views

वैभववाडी : वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाच्यावतीने शासकीय आधारभूत भात खरेदीचा शुभारंभ आज तालुक्यात दोन ठिकाणी करण्यात आला. वैभववाडी येथील तहसीलदार दिप्ती देसाई व भुईबावडा येथील केंद्राचा शुभारंभ माजी उपसभापती भालचंद्र साठे यांच्या हस्ते करण्यात आले. पोत्याचे पूजन करून आजपासून भात खरेदीला प्रारंभ झाला.
    
तालुका खरेदी विक्री संघाच्यावतीने दरवर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांचे भात खरेदी करण्यात येते. यावर्षीपासून तालुक्यातील दोन केंद्रावर भात खरेदी केली जाणार आहे ‌ याचा शुभारंभ आज झाला. यावेळी संघाचे  चेअरमन प्रमोद रावराणे, व्हाईस चेअरमन अंबाजी हुंबे,भालचंद्र साठे, दिगंबर पाटील, गुलाबराव चव्हाण ,संचालक पुंडलिक साळुंखे संजय रावराणे, जयसिंग रावराणे, उज्वल नारकर  महेश रावराणे, शैलेंद्र परब  सचिन तावडे, सूर्यकांत बोडके भुईबावडा सरपंच बाजीराव मोरे ,सोसायटी चेअरमन, पक्षांचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

 याप्रसंगी प्रमोद रावराणे यांनी संघाच्या कामगिरीची उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. ते म्हणाले, यावर्षी आॕनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून भात खरेदी केले जाणार आहे. प्रती किलो २१.८३ पैसे या दराने भात खरेदी करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी तालुका खरेदी-विक्री संघाकडून प्रति किलो २०.४० पैसे दराने ६८१ टन भात खरेदी करण्यात आले होती. त्यातुन तालुक्यातील ४५१ शेतकऱ्यांना १ कोटी ३९ लाख रुपये मिळाले होते. याशिवाय शासनाकडून प्रती हेक्टर १५ हजार रुपये बोनस देण्यात आला. तर यावर्षी शासनाने प्रतिहेक्टर २० हजार रुपये बोनसची घोषणा केली आहे. तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी संघाकडे भात देऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन प्रमोद रावराणे यांनी केले आहे.