खेमराज पुलाच्या नूतन बांधकाम कामाचा शुभारंभ..!

Edited by: विनायक गावस
Published on: March 15, 2024 14:29 PM
views 84  views

सावंतवाडी : मळेवाड देऊळवाडी येथील खेमराज पुलाच्या नूतन बांधकाम कामाचा  शुभारंभ माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाळून करण्यात आला. मळेवाड देऊळवाडी येथील मार्गावर असलेल्या नदीवर 1942 साली ऐक्य वर्धक संस्था मळेवाड या संस्थेने  ग्रामस्थांच्या मदतीने पूल उभारला होता.खूप जुना पूल असल्याने व तो वाहतुकीसाठी अरुंद असल्याने या ठिकाणी नव्याने पूल व्हावा अशी गेली कित्येक वर्षाची  ग्रामस्थांची मागणी होती.अखेर ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांच्या प्रयत्नाने व केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने सदर पुलाला दोन कोटी 60 लाख मंजूर झाले. गुरुवारी या पूलाच्या नूतन बांधकाम कामाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या सुरुवातील श्री देव वेतोबा कुलदेवता पूर्वी पंचायतन देवतेला आवाहन करण्यात आले.यानंतर सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा सरचिटणीस संजू परब  यांच्या श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी उपसरपंच हेमंत मराठे यांनी आपले मत व्यक्त करत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या पुलासाठी निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल त्यांचे आभार मानले.या पुलासाठी ग्रामस्थांनी व जमीन मालकांनी सहकार्य केल्या बद्दल त्यांचे आभार मानले.तर संजू परब यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना गावाच्या विकासासाठी सर्वजण एकत्र येऊन काम करत असल्याने परब यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले.गावाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही असे आश्वासीत केले.यावेळी सरपंच सौ मिलन पार्सेकर,ग्रा सदस्य अमोल नाईक,अर्जुन मुळीक,सानिका शेवडे,कविता शेगडे,मधुकर जाधव,पोलीस पाटील दिगंबर मसुरकर,तंटा मुक्ती अध्यक्ष प्रकाश पार्सेकर,केतन आजगावकर,परीक्षित मांजरेकर,ग्रामस्थ,जमीन मालक, शेतकरी आदी उपस्थित होते.