
वैभववाडी: तालुक्यातील स्टॉल हटाव विषय पेटला आहे.स्टॉलधारकांवर होणाऱ्या कारवाईविरोधात आज महत्त्वपूर्ण बैठक संघटनेचे नेते जयेंद्र रावराणे यांच्या घरी सुरू आहे .या बैठकीत स्टॉलधारक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. प्रशासन देखील कारवाई करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने स्टॉलधारक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता हा विषय पेटण्याची चिन्हे अधिक आहेत. आज आमदार नितेश राणे हे वैभववाडी दौऱ्यावर आहेत.ते स्टॉलधारकांना भेटणार का? यावर काही तोडगा काढणार का याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.