एसटी कामगारांमध्ये 'कही खुशी, कही गम'

Edited by: मनोज पवार
Published on: September 05, 2024 14:10 PM
views 107  views

चिपळूण :  एस.टी.महामंडळ कामगारांंअया संयुक्त कृती समितीच्या पदाधिकारी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यात काल बुधवार दि. ०४/०९/२०२४ रोजी , सायंकाळी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि आंदोलन स्थगित करण्यासाठी वाटाघाटी झाल्या. या आंदोलनातील कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे मूळ वेतन,  घरभाडे आणि महागाई भत्ता मिळावा, अशी होती. तसेच मागील वेतनवाढ फरकाची  येणे बाकी रक्कम लवकर मिळावी यांसह इतरही काही मागण्या होत्या.

यातील वेेतन वाढ विषयी,  दि.०१/०४/२०२० रोजी पासून मुळवेतनात सरसकट फक्त रु.६५००/- वाढ मिळाल्यानंतर कामगारांमध्ये निराशा पसरलेली दिसुन येत आहे. म्हणून कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून कामगार बांधवांना आवाहन करुन समजून काढली जात आहे की ,आपणांस सध्या मिळालेली वाढ जरी केवळ १५००/- , २५००/- & ४०००/- *(५०००/-,  ४०००/- & २५००/- रु. समायोजित करून)* अशी अल्प दिसून येत असली किंवा ती फार कमी वाटत असली तरी ती वाढ मुळवेतनात आहे व ती दि. ०१/०४/२०२० पासून(१७ महिने अगोदर) मिळालेली आहे. मात्र पूर्वीच्या  संपातील वाढ ही नोव्हेंबर २०२१ पासून (५०००/- , ४०००/- & २५००/-) देण्यात आली होती. 

आताच्या या वाढीमुळे दि.०१/०४/२०२० रोजी महामंडळात नोकरीस लागलेल्या कर्मचाऱ्यांचे सध्याचे सरासरी एकूण वेतन हे सध्या २४०००/-रु. च्या आसपास आहे. तर नवीन वाढीनंतर त्या कर्मचाऱ्याचे  वेतन पुढीलप्रमाणे राहील. *दि.०१/०४/२०२४* रोजी कर्तव्यावर रुजू  झालेल्या कर्मचाऱ्यांस (चालक) अंदाजित पुढीलप्रमाणे  *( २०९११ (मुळवेतन)+९६१९(महागाई भत्ता)+१६७२(घरभाडे)=३२२०२/- रु.  (एकुण पगार)* वेतन मिळेल.

 तर  या वाढीमध्ये २०१६-२०२० च्या ४८४९/- कोटी रु. मधील फरकाची शिल्लक रक्कम धरलेली नाही. ती वेगळी असेल. तसेच पुढील २०२४-२०२८ या चार वर्षांच्या अपेक्षित भावी वेतन वाढीही धरण्यात आलेल्या नाहीत.) कामगार बांधवांनो गैरसमज नसावा. असे, कामगारांना मोबाईलवर संदेश पाठवून दिले जात असतानाच,   ही पगारवाढ  फक्त, एस.टी.कामगार संयुक्त कृती समितीने दिलेल्या प्रस्तावानुसारच चर्चा होवून वाढलेली आहे.  इतर सेवा शक्ती व जनसंघाकडे कोणताही ठोस प्रस्ताव/आराखडा तयार नव्हता. केवळ मोघम स्वरूपातील आकडेवारी व प्रस्ताव होता, असेही या संदेशात म्हटलेे आहे. खरंतर ही वाढ कृती समितीला दि.०१/०४/२०१६ रोजीच्या सुधारीत वेतनात (पुर्वीचे मुळवेतनावर ) अपेक्षित होती.

 मात्र आंदोलन फोडण्यासाठी आयत्या पिठावर रेघोट्या मारण्यासाठी घुसलेले सुपारीबाज आमदार व वेल्डिंगचा चष्मा घुसल्यामुळे म्हणावी तशी अपेक्षीत वाढ पदरात पाडून घेता आली नाही. त्यातच वेल्डिंगच्या चष्म्याने कृती समितीतील एका सभासदाला अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करून ही चर्चा फिस्कटवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला होता. अशी वाईट शब्दांत संयुक्त कृती समितीकडून,  या आंदोलनात स्वतःहून उतरलेल्या आमदार गोपीचंद पडळकर,  आमदार सदाभाऊ खोत आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांंचे नाव न घेता , निर्भत्सना केेली आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले  आहे, की

 कृती समितीतील सदस्यांनी अत्यंत संयमाने व सावधगिरीने ही  परिस्थिती हाताळली आणि चर्चा मुळ मुद्दापासून भरकटु दिली नाही. कामगार बांधवांनो या आंदोलनात ऐनवेळी आ. पडळकरांनी जर शिरकाव केला नसता व मा. मुख्यमंत्र्यांनी केवळ कृती समितीसोबतच चर्चा केली असती तर आज परिस्थिती (पगार वाढ आणखी  जास्त) काही औरच असती.

ते या संदेशातून आवाहन करतात की,'कामगारांनो आपली  लढाई अजून संपलेली नाही. त्यामुळे खचून जाऊ नका. सध्या थोडीशी उसंत घेऊन पुन्हा एकदा नवीन जोशाने लढा उभा करून, येणाऱ्या काळात आपण शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन निश्चित पदरात पाडून घेवू' समितीकडून आलेला हा संदेश वाचून,  मिळाले तेवढे पदरात पडले , हेही नसे थोडके असे म्हणत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळचे, आंदोलनात सहभागी झालेले आणि न झालेले असे सर्वच कामगारांमध्ये  या  सणासुदीच्या काळात,  ' थोडी खुशी , थोडी गम'. परिस्थिती आहे.