
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातून रेल्वे गाड्या रद्द झाल्यानंतर एसटी आता रेल्वेच्या मदतीला धावताना दिसत आहे. सिंधुदुर्गातून सावंतवाडी, कुडाळ, कणकवली 6 बसेस या रेल्वे स्थानकातून थेट मुंबईला सोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये सावंतवाडी मधून 2, कणकवलीतुन 3 , कुडाळमधून 1 अशा सहा गाड्या या 4:30 ला रेल्वे स्थानकातून सोडण्यात येणार आहेत.
त्यामुळे कुठेतरी प्रवाशांना दिलासा मिळवा, यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू असल्याचे दिसत आहे. जे रेल्वे प्रवासी तिकीट कॅन्सल करतील त्यांना रेल्वे स्थानकामध्ये बस उपलब्ध व्हावी यासाठी ही एसटीने सेवा दिली असल्याचे समजत आहे.