एसटी चालक तात्या नाईक यांच्या तळवडेत सत्कार

Edited by: दिपेश परब
Published on: March 31, 2024 09:27 AM
views 488  views

वेंगुर्ले : वेंगुर्ले आजाराचे एसटी बस चालक तुळस येथील रहिवासी तात्या नाईक उर्फ बापू कुसुमाकर नाईक हे आज ३१ मार्च रोजी आपल्या २८ वर्षांच्या चांगल्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. यावेळी ते आपल्या सेवेतील शेवटची बस फेरी सावंतवाडी वरून वेंगुर्ले येथे घेऊन जात असताना तळवडे गेट स्टॉप येथे तळवडे ग्रामस्थ, व्यापारी व प्रवासी यांच्यावतीने नाईक यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सामाजिक कार्यकर्ते तथा व्यापारी प्रशांत पडते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी आनंद पेडणेकर, दाजी वराडकर, सुरेश कुंभार, ज्ञानेश्वर जाधव, बबन जाधव, वामन परब, जगदीश परब,  सुभाष मांजरेकर, उदय परब, सनाम कासार, उमेश पालकर, संदेश नाईक, झिला तळवणेकर, बाबी कावले व एसटी वाहक सत्यवान परब आदी उपस्थित होते.