कसाल इथं उभ्या कंटेनारला ST ची धडक | १५ प्रवासी जखमी

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 15, 2024 06:05 AM
views 304  views

सिंधुदुर्गनगरी : मुंबई गोवा महामार्गावर कसाल येथे सर्विस रोडवरुन  कणकवलीच्या दिशेने जाणारी राज्य परिवहन महामंडळाची मालवण डेपोची मालवण ते कोल्हापूर  एसटी बसची उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जाऊन धडक दिली. यात सुमारे १२-१५ प्रवासी जखमी झाले आहेत.कसाल  बस स्थानक जवळील खाजगी दवाखान्यात काही प्रवाशांवर प्राथमिक उपचार करून उर्वरित प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हकीकत अशी रविवारी सकाळी  मालवण डेपोची कोल्हापूर कडे सकाळी  ७.वासुटणारी एम एच ०७ -बीएल-२७१८.ही -मालवण- कोल्हापूर  ही एसटी  बस गाडी कसाल बस स्थानक येथून प्रवाशांना घेऊन पुढे सर्विस रोडने कणकवलीच्या दिशेने  मुख्य रस्त्यावर बाहेर पडत असताना  महामार्गावर कणकवलीच्या दिशेने तोंड करून उभ्या असलेल्या कंटेनरला एसटी बसची पाठीमागून जोरदार धडक बसली. यामध्ये बसमधील प्रवाशांच्या हात-पायाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. दरम्यान या धडकेत एसटी बसची पुढील  ड्रायव्हर साईटच्या बाजूचा पत्रही कट झाला आहे. तर गाडीच्या काचाही फुटल्या आहेत. या बस मधील दहा ते पंधरा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. एसटी चालक कडून सांगण्यात येत आहे की गाडीचे स्टेरिंग लॉक झाल्यामुळे एसटी बस कंट्रोल झाली नाही.गाडीतील प्रवाशांना लगेचच  कसाल येथील स्थानिक ग्रामस्थांनी व पोलीस महामार्ग वाहतूक पोलीस महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनी एसटीतील प्रवाशांना बाहेर काढत कसाल येथील खाजगी डॉक्टर पवार रुग्णालयात प्राथमिक मलमपट्टी व औषधोपचार करण्यात आले .व इतर प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात येथे अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.