
देवगड : दहिबांव ग्रामपंचायतीच्या वळनावर असतानाच देवगड तांबळडेग गाडीचे मागील चाक गटारात जावून गाडी एका बाजुला घसरून अपघात झाला. हा अपघात गुरूवारी सकाळी ९ वा.सुमारास झाला.सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही अथवा गाडीचेही नुकसान झाले नाही. मात्र या अपघातामुळे गाडी पुर्णत: रस्त्यावर असल्याने मिठबाव मार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती.
देवगड आगारातून सकाळी ८ वाजता सुटणारी देवगड तांबळडेग ही फेरी दहिबांव येथून व्हाया दहिबांव धनगरवाडी येथील मिठबांव हायस्कूलमध्ये जाणाèया मुलांना घेवून मिठबावंच्या दिशेने जात असताना दहिबांव ग्रामपंचायत येथे रस्ता अरूंद असल्याने मिठबांव रस्त्याचा दिशेने गाडी वळताना चालक आय.एस्.गेडाम यांना गाडी मागे पुढे घ्यावी लागली. यावेळी गाडीचे मागील चाक घसरून गटारात गेली. गाडीमध्ये शालेय विद्यार्थी होते. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही किंवा गाडीचे नुकसान झाले नाही.दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर एस्.टी विभागाला गाडी बाहेर काढण्यात यश आले. मात्र यामुळे मिठबाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.