युथ फेस्टिव्हलमध्ये SSPM अभियांत्रिकी कॉलेजची बाजी

Edited by: समीर सावंत
Published on: August 11, 2023 19:34 PM
views 91  views

कणकवली : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली च्या विद्यार्थ्यांनी प्रा. कल्पेश कांबळे, प्रा. शशांक गावडे, प्रा. स्वप्नाली जाधव, सौ. प्राची मिशाळ, श्री. गिरीश तेडोंलकर व स्वप्नाली गावकर  यांच्या मार्गदर्शनाखाली  दिनांक १० ऑगस्ट २०२३ रोजी  मुंबई विद्यापीठ , यांचे आयोजित आनंदीबाई रावराणे कला,वाणिज्य आणि सायन्स कॉलेज वैभववाडी येथे संपन्न झालेल्या ५६ व्या युवा मोहोत्सवाच्या विभागीय फेरीमध्ये महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाचा विद्यार्थी कु. कौस्तुभ धुरी याने नाट्यसंगीत प्रकारामध्ये तृतीय व शास्त्रीय गायन या प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.

तसेच कॉम्पुटर विभागाच्या कु. सोनाली पाटील हिने मेहंदी आर्ट्स प्रकारामध्ये तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठा अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून ३७ महाविद्यालयांनी सहभाग दर्शवला व सुमारे ७०० हुन अधिक विद्यार्थी सहभागी झाले. या करीता स्टुडंट कोआँर्डीनेटर म्हणून कु. श्रेयस चव्हाण, कु. प्राजक्ता जामसंडेकर, कु. मिशल रईस व कु. तन्वी पाडावे यांनी काम पाहीले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा मा.सौ. निलमताई राणे, उपाध्यक्ष मा. श्री. निलेशजी राणे, सचिव मा. श्री. नितेशजी राणे, प्राचार्य डाँ. महेश साटम, प्रशासकीय अधिकारी श्री. शांतेश रावराणे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.