
सिंधुदुर्गनगरी : जागतिक रक्तदान दिन SSPM लाईफटाईम हॉस्पिटलच्या रक्तपेढीत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्यावेळी कसाल येथील SDP डोनर गंधार चंद्रशेखर भिसे कुडाळ येथील यशवंत गावडे यांना सन्मानित करण्यात आले.
जागतिक रक्तदान दिनानिमित्त SSPM लाईफटाईम हॉस्पिटल अंतर्गत विविध स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले होते. त्याचेही बक्षीस वितरण करण्यात आले. त्याच बरोबर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात ४० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी सहभाग घेतला त्या सर्व रक्तदात्यांचा ही भेटवस्तु प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमानिमित्त लाईफटाईम हॉस्पिटलच्या मेडिकल सुप्रिटेंन्डेन डाॅ.वंदना गावपांडे, डिन डाॅ.अरूण कोवाळे, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सचिव किशोर नाचनोलकर, साईनाथ आंबेरकर, यशवंत गावडे, महेश राउळ, अॅलिस्टर ब्रिटो, SSPM लाईफटाईम हॉस्पिटल रक्तपेढीचे प्रमुख मनिष यादव व डाॅक्टर विद्यार्थ्यांसह रक्तदाते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.