एस.एस.आय कॉम्प्युटरला सलग १३ वर्ष बेस्ट परफॉर्मिग पुरस्कार

“एसएसआय कॉम्प्युटर”चे संचालक रघुनाथ तानावडे यांनी स्वीकारला पुरस्कार
Edited by: विनायक गांवस
Published on: December 08, 2022 16:49 PM
views 196  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग येथे एमकेसीएलच्या विभागीय मेळाव्यात “श्री साई इन्फोटेक (एस.एस.आय)” कॉम्प्युटरला सिंधुदुर्गातील “एमएस-सीआयटी” व “क्‍लिक” बेस्ट परफॉर्मिंग सेंटर या पुरस्काराने गौरविण्यात आले. एमकेसीएलच्या  संचालकीय व्यवस्थापिका वीणा कामत यांच्या हस्ते  “एसएसआय कॉम्प्युटर”चे  संचालक रघुनाथ तानावडे यांनी ‍हा पुरस्कार स्वीकारला.


श्री साई इन्फोटेक सन २०१० पासून सतत १३ वर्षे बेस्ट परफॉर्मिंग सेंटर म्हणून पुरस्कार मिळवत आहे. सन २०२२ मध्ये महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त “एमएस-सीआटी” व “क्‍लिक” तसेच एमकेसीएल व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मान्यताप्राप्त “क्‍लिक” चे  विविध व्यवसायिक कॉम्प्युटर कोर्सेसमध्ये २०२२ या वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार प्रधान करण्यात आला. यावेळी ‍रिजनल लिड सेंटरचे जयंत भगत, अतुल पतोडे, अमित रानडे, विकास देसाई, मंगेश जाधव, संतोष कोलते, प्रणव तेली उपस्थित ‍होते.