SSC RESULT 2023 | सोनुर्ली हायस्कूलचा निकाल 100 टक्के

अभिषेक जेठे पहिला
Edited by: विनायक गावस
Published on: June 02, 2023 15:17 PM
views 87  views

सावंतवाडी  : माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली या विद्यालयातून एकूण 22 विद्यार्थी शालांत परीक्षेमध्ये बसलेले होते.  परीक्षेत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रशालेचा निकाल 100 टक्के लागला आहे.

प्रथम क्रमांक अभिषेक विकास जेठे यान 89.60 टक्के गुण मिळवत प्राप्त केला आहे. द्वितीय क्रमांक गायत्री बापू निर्गुण 88.80 टक्के, तृतीय क्रमांक पूर्वा दशरथ गावकर -87.20 टक्के गुण प्राप्त केले आहे. या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अनंत परब शालेय समिती अध्यक्ष नागेश गावकर मुख्याध्यापक मोर्ये जी. एस. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे.