समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे ७५ कवींच्या कवितांचा 'सृजनरंग' काव्यसंग्रह प्रकाशित होणार

डॉ. योगिता राजकर, प्रा. मनीषा पाटील, मनीषा शिरटावले यांचे संपादन
Edited by:
Published on: February 03, 2025 18:26 PM
views 110  views

कणकवली : सिंधुदुर्गातील समाज साहित्य प्रतिष्ठान ही साहित्य चळवळ नव्या जुन्या लेखक कवींना प्रेरणा देण्यासाठी कार्यरत असते. आता या पार्श्वभूमीवर कोकण बरोबर महाराष्ट्रातील नव्या जुन्या 75 कवींच्या 75 कवितेचा सहभाग असणारा 'सुजनरंग ' हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात येत आहे. पुढील पंधरा दिवसात हा काव्यसंग्रह प्रकाशित होत असून या संग्रहाचे संपादन डॉ. योगता राजकर (वाई), प्रा.मनीषा पाटील (कणकवली) आणि मनीषा शिरटावले (सातारा) या तीन कवयित्रीनी केले असल्याची माहिती समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि सचिव सुरेश बिले यांनी दिली.

समाज साहित्य प्रतिष्ठानचे चौथे साहित्य संमेलन मालवण नाथ पै सेवांगण येथे ज्येष्ठ कवी प्रफुल्ल शिलेदार यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर मध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातील 50 कवींना कविसंमेलनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या कविसंमेलनाला संमेलन अध्यक्ष शिलेदार पूर्णवेळ उपस्थित होते. या सर्व कवींच्या कविता ऐकूण त्यांनी या कविता एकत्रित संकलित करण्याची सूचना केली. त्यानंतर या कविसंमेलनातील कवींबरोबरच महाराष्ट्रातील अन्य कवी असा 75 कवींच्या 75 कवितेचा सदर काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात येत आहे. कवी शिलेदार यांचीच या संग्रहाला अभ्यासपूर्ण पाठराखण लाभली असून सुप्रसिद्ध चित्रकार अनिल रंगारी (चंद्रपूर) यांनी संग्रहाचे देखणे मुखपृष्ठ रेखाटले आहे.

समाज साहित्य प्रतिष्ठान ही संस्था सिंधुदुर्गात स्थापन झाली असली तरी तिचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. या संस्थेचे पदाधिकारी महाराष्ट्राच्या विविध भागातील असल्याने या संस्थेचे कार्यक्रम कोकणबरोबर महाराष्ट्राच्या अन्य भागातही होत असतात. त्यामुळे 'सृजनरंग ' या काव्यसंग्रहात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील कवींचा समावेश करण्यात आला आहे.यात संध्या तांबे,अश्विनी कोठावळे, संजय तांबे, सागर कदम,संगीता पाटील,योगिता शेटकर,प्रेरणा चिंदरकर,शुभांगी वाघ,सफर इसफ,ऍड.अर्चना गवाणकर,आर्या बागवे,स्वप्ना केळकर, पल्लवी शिरगावकर, ऋतुजा सावंत, शुभांगी पवार,मंगल माने,प्रगती पाताडे, संतोष येळवे, संतोष ढेबे,रामेश्वर झोडपे, चेतन बोडेकर,हरिश्चंद्र भिसे,राजू संकपाळ,रचना रामदास रेडकर,रेखा शिर्के,डॉ.शुभांगी कुंभार,रमेश डफळ फौजी,श्रीगणेश शेंडे, किशोर देऊ कदम,अमित कारंडे,अक्षदा गावडे,डॉ प्रफुल्ल आंबेरकर,सत्यवान साटम,ऍड. मेघना सावंत,लता चव्हाण, प्रियदर्शनी पारकर,आत्माराम कदम, नीलम यादव,सतीश चव्हाण,विजय सावंत,मंगेश जाधव,दिलीप चव्हाण, दीपक तळवडेकर,कांचन सावंत,प्रज्ञा मातोंडकर,सोनाली कांबळे,तनुजा  रानभरे,

कल्पना बांदेकर,ॲड. प्राजक्ता शिंदे,संदीप कदम,सूर्यकांत साळुंखे,धम्मपाल बाविस्कर, प्रा.सुचिता गायकवाड, वृषाली सुभाष चव्हाण,प्रियांका वाकडे गुळवे,नेहा पुजारी,राजेंद्र पाटील,ऐश्वर्या डगांवकर,दीपक कासवेद,डॉ.दर्शना कोलते,धनाजी जेधे,गणेश शेलार,मनोहर परब,संचिता चव्हाण,प्रमिता तांबे,निशिगंधा गावकर,विजयकुमार शिंदे,निकेत पावसकर,पंडित कांबळे,शैलजा मातोंडकर आदी कवींच्या कवितांचा समावेश आहे.