कै. श्रीधरराव नाईक यांचा स्मृतीदिन २२ जूनला ; राबवणार सामाजिक कार्यक्रम

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 20, 2023 11:35 AM
views 243  views

कणकवली : कै. श्रीधरराव नाईक यांचा ३२ वा स्मृतीदिन गुरुवार २२ जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता कणकवली येथील  कै. श्रीधरराव   नाईक चौक येथे साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता  कै. श्रीधरराव नाईक यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. तसेच रक्तदान शिबीर व महिला बचत गटांचा सत्कार करण्यात येणार आहे. 

यावेळी शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत, उपनेते, जिल्हासंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत,आमदार वैभव नाईक,जिल्हाप्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर,जिल्हाप्रमुख संजय पडते, अतुलजी रावराणे, माजी खा. ब्रिगे. सुधीर सावंत,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी जि.प. सदस्य बाळा भिसे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, जिल्हाप्रमुख नीलम पालव हे उपस्थित राहणार आहेत.यावेळी  नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्रीधर नाईक प्रेमींनी  केले आहे.