
वैभववाडी : तिथवली येथील श्री स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी NMMS परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे.या विद्यातील पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले.आर्थिक दुर्बल प्रवर्गात श्रेया मधुकर राठोड ही जिल्ह्यात प्रथम आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत डिसेंबर २०२४ मध्ये NMMS परीक्षा घेण्यात आली होती.याकरिता स्वामी विवेकानंद हायस्कूलचे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.यामध्ये कु.श्रेया मधुकर राठोड, दुर्गेश दिगंबर हरयाण
प्रमेय गणेश कुडाळकर हे तीन विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांना प्रत्येकी ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. तसेच याच विद्यालयाची सुमन रामचंद्र राठोड,जयेश संतोष गोरुले हे दोन विद्यार्थी राज्य शासनाच्या सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. त्यांना प्रत्येकी ३८ हजार ४०० रुपये शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. मागील तीन वर्षापासून या विद्यालयातील इयत्ता आठवीचे एकूण ११ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्याना प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचे शाळां व्यवस्थापन समिती व पालकांनी कौतुक केले.