
सावंतवाडी : श्री शिव छत्रपती माध्यमिक विद्यालय असनीये या विद्यालयाचा या वर्षीचा शालांत परीक्षेचा निकाल १०० टक्के येवढा लागला असून परीक्षेस प्रविष्ट १३ पैकी १३ ही विद्यार्थी पास होत शाळेच्या उज्वल यशाची निकालाची परंपरा कायम राखली आहे. यात सायली शिवा गावकर हिने ८७.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला तर समृद्धी नामदेव गावडे ८५टक्के गुणांसह व्दितीय तर स्नेहल संजय गावडे ८१.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. निकालात मुलींनी बाजी मारली असून तिन्ही क्रमांक मुलीमधून आले आहेत . यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मिलिंद प्रताप तोरसकर ,प्रशालेच्या मुख्याध्यापक जानवी गजानन सावंत यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.