श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाचे ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत यश

Edited by:
Published on: April 04, 2024 15:14 PM
views 512  views

मालवण : डॉक्टर शिरोडकर एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयचा इयत्ता सातवीतील विद्यार्थी कुमार वेद प्रवीण कुबल याने ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत सुवर्णपदक पटकावले आहे. त्याला 100 पैकी 87 गुण मिळाले. तसेच इयत्ता सहवीतील विद्यार्थिनी कु. वेदिका परशुराम लुडबे हिला 100 पैकी 75 गुण मिळाले. त्याना या परीक्षेसाठी शिक्षक पी पी कुबल यांचे मार्गदर्शन लाभले आहे.


त्याच्या या यशाबद्दल संस्था पदाधिकारी, शालेय समिती पदाधिकारी, स्थानिक समिती पदाधिकारी, पालक शिक्षक संघ, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांनी कौतुक केले आहे.