श्री रामेश्वर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा आठवणींना उजाळा

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 15, 2024 09:54 AM
views 433  views

देवगड : देवगड येथील श्री रामेश्वर हायस्कूल मिठबावच्या सन १९८० एस एस सी वर्गातील विद्यार्थी मित्र-मैत्रिणी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आल्या.एवढ्या कालावधी नंतर प्रत्येकाला शोधायचे कसे असा यक्षप्रश्न त्यांच्या समोर होता शेवटी १९८० च्या व्हाॅट्सअॅप समुहातून एकाएका मित्र, मैत्रिणी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक त्यांनी मिळवत दि. १४ मे २०२४ या दिवशी आनंद लोके, जयानंद फाटक, प्रमोद कांदळगावकर अशी त्रिसदस्यीय समितीने जबाबदारी हे काम करत स्नेहसंमेलन संपन्न झाले.

त्यानंतर प्रत्येकाने आपआपला परिचय दिला. या वेळी देवगड येथील स्नेहवर्धक सभागृह येथे मोठ्या संख्येने  देवगड येथील श्री रामेश्वर हायस्कूल मिठबावच्या सन १९८० एस एस सी वर्गातील विद्यार्थी  मित्र मैत्रिणी उपस्थित राहून शालेय जीवनातील आठवणींना या वेळी उजाळा दिला. तद्वतच शिक्षकवृंदाच्या आठवणींना उजाळा देत असताना काही शिक्षक, मित्र मैत्रिणी आज आपल्यामध्ये नाहीत. त्यांच्या  आठवणींना उजाळा देत असताना काहींच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. काहीजण म्हणाले की, अद्याप ते डोळ्यांसमोरून जात नाहीत. सकाळी दहा तीस वाजता सुरू झालेले हे स्नेहसंमेलन रंगतदार तेवढ्याच उत्साहात साजरे होत असताना  संध्याकाळचे पाच केव्हा वाजले ते समजले नाही. 


या वेळी  हायस्कूलच्या प्राचार्य निलम ढोलम तर जिल्हा पुरवठा अधिकारी रेणुका तेली यांचा गुणगौरव करण्यात आला. या वेळी निर्मला खेडेकर, विजयालक्ष्मी डगरे, प्रदिप कोळंबकर, सुर्यकांत घाडी, लक्ष्मण खाडिलकर, दत्तात्रय टिकम, रवि लोके, विनोद पडवळ, मनोहर लोके, किशोर सरवणकर, शिवशंकर लोके, प्रविण लाड, सुहास वळंजू, प्रेमानंद ढोके, प्रमोद ढोके आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद कांदळगावकर यांनी केले .