कसाल श्रीदेवी पावणाई रवळनाथ मंदिरात श्री रामनवमी महोत्सव

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: March 29, 2025 13:29 PM
views 181  views

सिंधुदुर्गनगरी : कसाल येथील श्रीदेवी पावणाई रवळनाथ मंदिर येथे दि.३० मार्च रोजी गुढीपाडवा ते 6 एप्रिल या कालावधीत श्री रामनवमी महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

दरम्यान यावेळी रविवार दि. 30 रोजी गुढीपाडवा निमित्त सकाळी नववर्ष स्वागत दिन. 10 वा. घटस्थापना सायं,6 ते 8. नामस्मरण, रामरक्षा पठण, पुराण वाचन रात्री 9 वा. परबवाडी- मर्तलवाडी  चित्ररथ दिंडी, सोमवार दि  31, रोजी सायं,6ते 8, नामस्मरण, रामरक्षा पठण, पुराण वाचन, रात्री 8, वा. वझरेवाडी  मित्र मंडळाची चित्ररथ दिंडी, रात्री 9 वा. तारादेवी महिला फुगडी ग्रुप केळुस वेंगुर्ला फुगडी ग्रुप नृत्य. दि.1 एप्रिल रोजी मंगळवारी सायं, 6 ते 8 नामस्मरण, रामरक्षापठण, पुराण वाचन. 9 वा. कुंभारवाडी, गंगोचीराई चित्ररथ दिंडी. बुधवार दिनांक 2 रोजी सायं, 6 ते 8 नामस्मरण रामरक्षा पठण, पुराण वाचन, रात्र नऊ वाजता देवी भुमीका दशावतार नाट्य मंडळ यांचा नाट्यप्रयोग मालक नितीन आशेयकर,. गुरुवार दिनांक 3 रोजी सायं, स6 ते8,नामस्मरण, रामरक्षा पठण पुराणवाचन, रात्री 9 वा. महिला बचत गटांसाठी कार्यक्रम कलाविष्कार. शुक्रवार दिनांक 4 रोजी सायं 6ते 8,नामस्मरण, रामरक्षा पठण, पुराण वाचन, रात्री 8 वा. बुवा सुपर्ण पोखरणकर यांचे कीर्तन.रात्री 9 वा. नाईक मोचेमांडकर नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग, मालक तुषार नाईक.शनिवार दि.5 रोजी सायं .6ते 8 वा. नामस्मरण रामरक्षा पठण पुराण वाचन, रात्री 8 वा.बुवा सुपर्ण पोखरणकर यांचे किर्तन.रात्री 9वा. संकल्प क्रिएशन डान्स अकॅडमी पुरस्कृत नृत्यरंग..

 रविवार दि. 6 रोजी सकाळी 9 वा. पुराण वाचन ,10 वा , कीर्तन सुपर्ण पोखरणकर बुवा.दुपारी 12 वा. श्रीराम जन्मसोहळा, 1वा, महाप्रसाद, सायं7 वा. दीपोत्सव,8 वा. सांस्कृतिक कार्यक्रम,11 वा. पालखी मिरवणूक,12  वा वावळेश्वर नाट्य मंडळ  तेंडोली यांचा दशावतार नाट्य प्रयोग, मालक मेघश्याम सर्वेकर, संचालक पराग सुर्वे.आदी क्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविकांनी ग्रामस्थांनी व पंचक्रोशीतील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी पावणाई रवळनाथ देवस्थान कमिटी कसाल व गावचे मानकरी, ग्रामस्थ यांनी केले आहे.