
वेंगुर्ले : गुरुवर्य पंडित श्री मयंक बेडेकर यांचे शिष्य श्री भावेश प्रमोद राणे यांच्या श्री माऊली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गुरुवंदना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी श्री एच.बी सावंत , श्री प्रमोद दत्तात्रय राणे, श्री रावजी सावंत, श्री दादा नाईक, श्री सुधीर राऊळ, श्री मुकुंद परब, श्री अजित पोळजी,श्री बाबु गोडकर, श्री सचिन पांगम यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले वादन कौशल्य दाखवून सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक नामवंत कलाकार व्यक्तींची उपस्थिती लाभली. शेवटी विद्यार्थ्यांनी आपले गुरुवर्य भावेश राणे यांना गुरुपुजन करून गुरुवंदना दिली. कार्यक्रमाच्या शेवटी भावेश राणे यांनी या कार्यक्रमातील सर्व सेवा आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण केली.