
सावंतवाडी : दाणोली गावठण येथील श्री लिंग माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव आज शनिवारी होत आहे. केसरी, दाणोली आणि देवसू या तीन गावचे हे देवस्थान असुन नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणींची पाठीराखी अशी लिंग माऊलीची ख्याती आहे. या दिवशी केसरी, दाणोली, देवसू या तीन गावच्या पालखीचे देवसू येथील शेंडोबा माऊली मंदिरातून सवाद्य मिरवणुकीने या मंदिरात आगमन होणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर देवीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजवील्यानंतर देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरण्यात येणार आहे. यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणूकीनंतर आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे.