आंबेगावात १७ ऑक्टोबरपासुन ३२ सावे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर माऊली पारायण..!

Edited by: विनायक गावस
Published on: October 08, 2023 17:51 PM
views 37  views

सावंतवाडी : आंबेगाव येथील श्री देव लिंग क्षेत्रपाल मंदिरात ३२ साव्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर माऊली पारायणास मंगळवार दिनांक १७ ऑक्टोबरपासुन प्रारंभ होत आहे. घटस्थापनेपासून ते विजया दशमी पर्यंत चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उत्सवासाठी या वर्षीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असुन अध्यक्षपदी दिपक साबा गावडे, उपाध्यक्षपदी जयानंद लक्ष्मण परब, सचिवपदी जनार्दन बाबू जंगले, सहसचिवपदी अण्णा केळुसकर, खजिनदारपदी योगेश बाळकृष्ण गवळी यांची एकमताने निवड करण्यात आली. तर कार्यकारणी सदस्यपदी सखाराम गोपाळ कुंभार, लक्ष्मण बाबली गोसावी, केशव रामकृष्ण मुळीक, निखिल सुरेश परब, संतोष दत्ताराम राणे, शिवाजी पांडुरंग परब, अमित रामचंद्र सावंत, लवू रामू जंगले, लक्ष्मण दत्ताराम कडव, रमेश बाबली गावडे, दाजी न्हानू तेली, मंगेश गोविंद आंगचेकर, रामदास दत्ताराम नाईक, प्रमोद तुकाराम परब, अनिल सिताराम गावडे, गणेश कृष्णा मेस्त्री, पुंडलिक गुणाजी जाधव, रामचंद्र नारायण परब, स्वप्नील सुरेश सावंत, अशोक निळू शिंदे यांची निवड करण्यात आली.

या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर माऊली पारायणाचा शुभारंभ मंगळवार १७ ऑक्टोबर रोजी भाजपा युवा नेते तसेच युवा उद्योजक विशाल परब यांच्या उपस्थितीत सकाळी ८.00 वाजता होणार असुन या सात दिवसाच्या कालावधीत दररोज सकाळी ५ वाजता काकड आरती, सकाळी ८  वाजल्यापासून ज्ञानेश्वरी वाचन, संध्याकाळी ४ वाजता प्रवचन, संध्याकाळी ६ वाजता हरिपाठ, रात्री ८ ते १० कीर्तन, रात्री १० वाजल्यापासून धनगरी नृत्य व इतर सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रामस्थांची भजने होणार आहेत. दिनांक 23/10/2023 रोजी होणाऱ्या महाआरती (दीपज्योती) कार्यक्रमाचे उद्घाटन युवा उद्योजक व सामजिक कार्यकर्ते अमित रामकृष्ण राणे (कोलगाव) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दिनांक 24/10/2023 रोजी सकाळी ठीक 8.00 वाजता दिंडी, काल्याचे कीर्तन व दुपारी महाप्रसादाने कार्यक्रमांची सांगता होईल. या कार्यक्रमासाठी वस्तू स्वरूपात किंवा देणगी स्वरूपात मदत द्यावयाची असल्यास 7499248252 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रम समिती अध्यक्ष दीपक साबा गावडे आणि देवस्थान समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर परब, आंबेगाव देवस्थान पंच मानकरी व ग्रामस्थांनी केले आहे.