बांदा गोठण येथे श्री गवळदेव उत्सव उत्साहात

बांदा गवळीटेंब, निमजगा व शेटकरवाडी ग्रामस्थ एकत्र येऊन करतात उत्सव
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 15, 2022 16:56 PM
views 266  views

बांदा : बांदा गोठण येथे प्रतिवर्षाप्रमाणे श्री गवळदेव उत्सव हा पारंपारिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. बांदा गवळीटेंब, निमजगा व शेटकरवाडी ग्रामस्थ एकत्र येऊन हा कार्यक्रम करतात.

यानिमित्त गोठण य़ेथे श्री गवळदेवाची पुजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर नैवेद्य व आरती होऊन महाप्रसादाला आरंभ झाला. सर्वांच्या रक्षण व कल्याणासाठी श्री गवळदेवाला  साकडे घातल्या नंतर या सोहळ्याची सांगता झाली. याप्रसंगी या परंपरेबाबत माहीती देताना रहिवासी अविनाश सावंत तसेच शरद सावंत यांनी सांगितले की पुर्वापार ही प्रथा सुरु असून पुर्वीच्या काळी या ठिकाणी परिसरातले गुराखी आपल्या गुरांना चरायला व पाण्यासाठी सोडत व  एकत्र जमून आपली शिदोरी खात. त्यावेळी त्यांचे व गोधनचे रक्षण करणारी देवता असलेल्या गवळदेवाला वंदन करत. एकत्र येऊन गोठण य़ाठिकाणी गवळदेवाचे पुजन करुन जेवण तयार करुन वनभोजनाची परंपरा पुढच्या पिढ्यांनी अद्याप सुरु ठेवली आहे. यावेळी तीन्ही वाडीतील ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.