श्री दत्तमंदिर स्थानिक सल्लागार उपसमिती - व्यवस्थापन समितीस मान्यता

Edited by: विनायक गांवस
Published on: April 22, 2024 08:07 AM
views 157  views

सावंतवाडी : येथील श्री दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीस देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर (विधी व न्याय विभाग अंतर्गत) यांचेकडून मंजुरी मिळाली असून सदर स्थानिक सल्लागार उपसमितीमध्ये पोलीस अधिकारी दयानंद दत्ताराम गवस यांचे अध्यक्षतेखाली १४ सदस्यांना मंजुरी मिळाली आहे. सदर स्थानिक सल्लागार समितीमध्ये अध्यक्ष दयानंद दत्ताराम गवस, सचिव जितेंद्र प्रभाकर पंडित, खजिनदार सुधीर श्रीपाद धुमे, सदस्य राजन वामनराव आंगणे अशोक महादेव नाईक, विनायक सावळाराम पराडकर, दीपक परशुराम पटेकर, खेमराज न्हानु कुडतरकर, सतीश धोंडू घोगळे, गंगाराम विजयकुमार पई, संतोष भिकाजी तळवणेकर, विलेश गणपत गोवेकर, जगदीश सहदेव मांजरेकर, लतिका लक्ष्मण सिंग अशा १४ जणांच्या नावास मंजुरी मिळाली आहे. उक्त देवस्थानाच्या जीर्णोद्धार व स्थानिक व्यवस्थेसाठी यापूर्वी असलेल्या स्थानिक उपसमितीची मुदत संपली असल्याने ऑफिसर इन्चार्ज उपकार्यालय सावंतवाडी यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार गाव बैठक आयोजित केली होती. या बैठकीत एकूण १५ लोकांची निवड केली होती. यामध्ये विष्णू विठ्ठल सावंत यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून चरित्र पडताळणी दाखला सादर केला नसल्याने त्यांना वगळून इतर १४ जणांच्या उपसमितीला देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र , कोल्हापूर यांचेकडून मंजुरी देण्यात आली. तसा आदेश क्रं.देव. वशि.जा.क्र. ४८४/२०२४ ने १५ मार्च २०२४ च्या पत्रानुसार देण्यात आला. या उपसमितीची मुदत आदेशापासून पुढील पाच वर्षे राहील.