वेंगुर्लेतील श्री चिंतामणी संगीत विद्यालयाचा गुरु अभिवादन सोहळा उत्साहात !

तबला, पखवाज - हार्मोनियम वादनासह गायनांचे सादरीकरण
Edited by: दिपेश परब
Published on: August 10, 2023 17:45 PM
views 131  views

वेंगुर्ला : येथील श्री चिंतामणी प्रतिष्ठान संचलित श्री. चिंतामणी संगीत विद्यालयाचा गुरु अभिवादन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या सोहळ्यात संगीत विद्यालयातील शिष्यवृंदांच्या तबला, पखवाज, हार्मोनियम सोलो वादनासह गायनांचेही सादरीकरण करण्यात आले. तसेच पखवाज व तबला वादन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. संगीत विद्यालयाचे संचालक तथा पखवाज विशारद निलेश पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्य परिवाराच्यावतीने येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

         यावेळी व्यासपीठावर आंतराष्ट्रीय कीर्तीचे हॉलीबॉल पंच अशोक दाभोलकर, सौ. मंजुषा दाभोलकर, तबला शिक्षक श्री. प्रमोद मुंड्ये, पखवाज शिक्षक श्री. मोहन मेस्त्री, महेश बोवलेकर, हार्मोनियम वादक गजानन मेस्त्री, गायक वैभव परब बुवा, शिवप्रसाद घारे, बांदवलकर गुरुजी, सुनिल नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

        मा कार्यक्रमाचे उद्‌घाटन श्री गणेश आणि सरस्वती मातेच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या कार्यक्रमात प्रारंभिक ते विशारद पर्यंतच्या तबला व पखवाज वादन परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर प्रसिद्ध तबला वादक श्री. बंड्या धारगळकर, नाटय दिगदर्शक दादा हळदणकर, श्री. नार्वेकर, दशावतार कलाकार पप्पु नांदोस्कर, निवेदक काका सावंत, शुभम धुरी, बाबुराव खवणेकर आदी उपस्थित मान्यवरांचा सुद्ध्या सत्कार करण्यात आला.

     यावेळी बोलताना श्री. दाभोलकर म्हणाले, विदयालयाला २० वर्षे पुर्ण झाली. या याकाळात विद्यालयाच्या माध्यमातून आजपर्यंत संगीत आणि सामाजिक क्षेत्रात झालेले कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. याप्रसंगी संचालक श्री निलेश पेडणेकर यांचा त्यांनी शाल श्रीफळ देऊन विशेष सन्मान केला. तर लोकमान्य को. ऑफ. मल्टीपर्पज बँकेच्या माध्यमातून सुद्धा श्री. पेडणेकर यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यालयाच्या माध्यमातून विद्यालयाचे यशस्वी विद्यार्थी मनिष तांबोस्कर, गोल्ड मेडल विजेता तेजस मेस्त्री, भाविका खानोलकर यांचाही सत्कार करण्यात आला.

        या कार्यक्रमात एकूण ८४ विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करून रसीकांची वाहवा मिळवली. तर यामेश खवणेकर याने सादर केलेल्या बासरी वादनाला प्रसन्न गावडे आणि भूषण सावंत यांनी उत्तम पखवाज व तबला साथ देत कार्यक्रमात रंगत आणली. हा कार्यक्रम विनाखंड १३ तास सुरु होता. यात विद्यार्थ्यांनी सुद्धा उत्तम प्रतिसाद देत सादरीकरण केले.

        कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चिंतामणी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष श्री प्रविण कांदळकर, भाई वेंगुर्लेकर, महेश मुणनकर, सागर सावळ, प्रतीक शेटकर, सचिन नाईक, गणेश आरावंदेकर, सुयोग कासकर, काका पालकर, पांडुरंग माडये, मंदार आरावंदेकर, वेदांग बोवलेकर, राजाराम पिंगुळकर, नितीन परब, करण परब आदी विदयार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.

         कार्यक्रमाची सांगता श्री सत्यनारायण कळंगुटकर, तेजस मेस्त्री आणि पुरुषोत्तम परब यांनी सादर केलेल्या अभंग, गौवळण आणि भैरवीने करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काका सावंत आणि शुभम धुरी यांनी केले.