केंद्र सरकारच्या कामांची माहिती तळगाळापर्यंत पोहोचवा

डॉ. मिलिंद कुलकर्णी यांचे आवाहन
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 19, 2025 19:34 PM
views 130  views

कणकवली : अमृत काळात भारताने जी झेप घेतली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच विकासभी आणि विरासतभी असे सांगत जेवढे विकासाला धरून आहेत. तेवढे हिंदुत्वाला धरून काम केले आहे. आज भारतात अनेक मोठ मोठे प्रकल्प होत असल्याने भारताचे नवीन चित्र उभारत आहे. हे चित्र तळागाळापर्यत पोहोचवणे गरजेच आहे. २०१४ मध्ये जगामध्ये भारताची ओळख होती पण आज भारताची जगामधली ओळख पाहता जमीन-आसमानाचा फरक आहे. जो सन्मान, मान व मिळणारी किंमत पाहता जगामध्ये मिळणारे आपले स्थान भारताची ताकद वाढवत आहे. आज अनेक देशात मोदींना मान-सन्मान देत आहेत. यामुळे भारत मोठा उद्योग व व्यापारपेठ बनत आहे. त्यामुळे अगामी काळात गुंतवणूक वाढणार आहे, हे मोदी सरकारचे यश आहे. यासाठी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारमार्फत ज्या योजना व केलेली कामे आहेत ती ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यत पोहोचवा, असे आवाहन डॉ. मिलिंद कुलकर्णी यानी केले.

मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कामगिरीबद्दल व विकसित भारताचा अमृतकाळ काळानिमित्त कणकवली ग्रामीण मंडलाच्यावतीने कासार्डे येथील अभिषेक मंगल कार्यालय येथे विकसित भारत संकल्प सभा आयोजित केली होती. याप्रसंगी डॉ. कुलकर्णी बोलत होते. कणकवली विधानसभाप्रमुख तथा विकसित भारत संकल्पचे संयोजक मनोज रावराणे, कणकवली ग्रामीण मंडलाध्यक्ष दिलीप तळेकर,महिला मंडलाध्यक्ष हर्षदा वाळके,माजी जि.प. सदस्य संजय देसाई,माजी जि.प. सभापती बाळा जठार,माजी उपसभापती  प्रकाश पारकर, सरचिटणीस पंढरी वायंगणकर,जिल्हा सरचिटणीस पूजा जाधव,भाजपा युवामोर्चा सरचिटणीस पप्पू पूजारे,मंडलाध्यक्ष सहदेव खाडये, सोनू सावंत,प्रकाश सावंत,तळेरे सरपंच हनुमंत तळेकर ,कासार्डे सरपंच निशा नकाशे,खारेपाटण सरपंच प्राची ईस्वलकर,कुरंगवणे सरपंच सुजित (पप्पू)ब्रम्हदंडे, कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर,साळिस्ते उपसरपंच जितेंद्र गुरव, कलमठ उपसरपंच स्वप्नील चंद्रकांत,शक्तीकेंद्र प्रमुख सुधीर कुबल, राजेश जाधव, भरत चव्हाण, गणेश पाताडे,नरेश गुरव, सुशील इंदप,सदा चव्हाण,यासीर म्हास्के,संतोष जाधव, संतोष परब,प्रशांत परब रज्जाक बटवाले, सुनील तांबे याच्यासह कणकवली ग्रामीण मंडलातील इतर सरपंच,उपसरपंच, सदस्य,शक्तीप्रमुख व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

२०१४ पूवीर्चा भारत वेगळा होता, दुबळा होता मात्र आता भारत चौथ्या क्रमांकावर येऊन पोहोचला आहे म्हणून देशाची ताकद वाढत आहे.आज संरक्षण क्षेत्र,महिला आरक्षणासह सर्वत्र क्षेत्रात आपण पुढे येत असून पुढच्या भारताचे चित्र वेगळे आहे.आज राममंदिर,काशीविश्वनाथ मंदीर,महाकाल मंदीरसह अनेक धर्मियांची श्रध्दास्थाने विकसित करण्यात आली आहेत. मुस्लिम,दलितांसाठी अनेक योजना येत आहेत.त्याबरोबर धर्माच्या पलीकडे जाऊन विकास केला आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

मनोज रावराणे यांनी मोदी सरकारच्या अकरा वर्षाच्या कामगिरीची माहिती देत अमृत काळात भारत कसा बदलत आहे हे सांगितले. दिलीप तळेकर यानी घराघरांत मोदी यांच्या योजना पोहोचवा. आगामी निवडणुकांत भाजपचा विजय पक्का असून  देशात नरेंद्र मोदी प्रमाणे जिल्ह्यात खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे काम करीत आहेत. यावेळी मोदी सरकारच्या योजनांचा कसा फायदा झाला याबाबत पूनम कुडतरकर, आस्था पाटणकर, संतोष जाधव, प्रकाश गुरव, सुनिल तांबे,राजू जठार,गुरुनाथ आचरेकर, रज्जाक बटवाले यानी मनोगतात सांगितले. यावेळी मोदी सरकाराच्या विकसित भारत संकल्पनेच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन मनोज रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक प्रकाश पारकर यांनी केले. आभार दिलीप तळेकर यांनी मानले.    

मंत्री नितेश राणे हिंदुत्वासाठी प्रसिध्द : डॉ. मिलिंद कुलकर्णी

हिंदुत्वाचा प्रसार करताना नितेश राणेवर खुप टीका झाली. मात्र मंत्री झाल्यावर दौरा लागल्यानतंर त्या दौ-यात दोन लग्न होती एक लग्न होते नांदगाव येथिल रज्जाक बटवाले याच्या घरी व दुसरे लग्न होते गिर्ये येथिल आरीफ बगदादीच्या घरी ही दोनही लग्ने मंत्री नितेश राणे यानी उपस्थिती लावली होती. यामुळेच ते मुस्लिम विरोधी असते तर पहील्या दौ-यात गेले नसते यामुळे त्याचे हिंदुत्व मुस्मिम विरोधी नसून देशद्रोहयाच्या विरोधी आहे.यामुळे त्याचा प्रवास सवार्ना  सोबत घेऊन जाणारा आहे.