
दोडामार्ग : दोडामार्ग तालूकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा सरस्वती विद्यामंदिर,कुडासे प्रशालेच्या मैदानावर संपन्न झाल्या या स्पर्धांचे उदघाटन कुडासे सरपंच पूजा देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सायली परब, शालेय समिती सदस्य प्रकाश कुडास्कर, रामदास मेस्री, उदय गवस, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पूजा दत्तप्रसाद देसाई, तालूका समन्वयक हनुमंत सावंत, दोडामार्ग प्रशालेचे मुख्याध्यापक शैलेश नाईक, एस.व्ही.देसाई उपस्थित होते.
यावेळी सरपंच पूजा देसाई यांनी विद्यार्थाच्या सर्वागीण विकासासाठी केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान पुरेसे नाही, शालेय पाठ्यक्रमाबरोबर खेळाला सुद्धा तितकेच महत्वाचे स्थान दिले पाहिजे. निरोगी शरीर हे मानसिक स्वास्थ्य कायम राखते यासाठी शालेय स्तरावर खेळांना अनन्य साधारण असे महत्व आहे. म्हणूनच मुलांनी अभ्यासाबरोबरच खेळाला सुद्धा प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलं.
यावेळी झालेल्या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे -:
१४ वर्षाखालील मुले
प्रथम - सरस्वती विद्यामंदिर,कुडासे
१४ वर्षाखालील मुली
प्रथम - दोडामार्ग हाय.दोडामार्ग
१७ वर्षाखालील
मुले व मुली
प्रथम- दोडामार्ग हाय.दोडामार्ग
१९ वर्षाखालील मुले
प्रथम-न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि.काॅलेज भेडशी
१९ वर्षाखालील मुली
प्रथम -दोडामार्ग ज्युनि.काॅलेज दोडामार्ग
या स्पर्धासाठी पंच म्हणून विजयकुमार साळुंखे, आनंद बामणीकर, प्रविण केसरकर, अजय सावंत, सोमनाथ गोंधळी यांनी काम पाहिले.