युवासेनेच्या शिरगांव येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 07, 2023 20:00 PM
views 130  views

देवगड : कणकवली विधानसभा मतदारसंघातील कोलमडलेली आरोग्य यंत्रणा सुस्थितीत यावी व चांगली आरोग्य सुविधा या मतदारसंघातील नागरिकांना मिळावी या उद्देशाने युवासेना पदाधिकाऱ्यांमार्फत आरोग्य यंत्रणेच्या विरोधात आवाज उठविला होता. फक्त टीका न करता नागरिकांना चांगल्या आरोग्य सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने युवासेना पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. त्याचबरोबर आता युवासेनेच्या माध्यमातून कणकवली विधानसभा मतदारसंघात ६ ठिकाणी मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराला ग्रामीण भागातून निश्चितपणे उस्फुर्त प्रतिसाद लाभणार आहे. असा आत्मविश्वास सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी शिरगाव येथे आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केला.


       शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून मतदार संघातील ६ ठिकाणी नेत्र चिकित्सा मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ देवगड तालुक्यातील शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथून बुधवारी सकाळी करण्यात आला. या उद्घाटन सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर ,कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करून या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.


यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम, उपतालुकाप्रमुख रवींद्र जोगल ,देवगड युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, देवगड नगरसेवक विशाल मांजरेकर, शिरगाव सरपंच समीर शिरगावकर, उपसभापती अमित साळगावकर,कणकवली तालुका युवासेनाप्रमुख उत्तम लोके,विभाग प्रमुख बंटी पवार, उपतालुका युवासेना प्रमुख सचिन पवार, शाखाप्रमुख महेश मेस्त्री, युवा समन्वयक मनोज भावे , शिवसेना जिल्हा महिला शिवसेना संघटक नीलम  पालव,शिवसेना उपजिल्हाप्रमुख पूर्वा सावंत ,सौ प्रतीक्षा साटम, ग्रामपंचायत स्नेहा मेस्त्री, शहरप्रमुख वसंत साटम,विक्रांत नाईक,हरी चव्हाण, वैद्यकीय अधिकारी ओम प्रकाश रामटेके, आरोग्य विस्तार अधिकारी प्रतिमा वळंजु व अन्य उपस्थित होते.


      या नेत्र चिकित्सा मोतीबिंदू तपासणी शिबिरात १६३ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली असून ४८ रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यात व तसेच ५० रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत.


याप्रसंगी बोलताना सतीश सावंत म्हणाले ,प्रत्येक व्यक्तीला नजर महत्वाची असून आपली  नेत्र दृष्टी ही महत्त्वाचे आहे शिवसेनेच्या माध्यमातून ८० टक्के समाजकारणी २० टक्के राजकारण करत असताना युवा सेनेच्या माध्यमातून अशा प्रकारचे उपक्रम राबवत असताना या उपक्रमाच्या माध्यमातून शासन विविध योजनांचा लाभ मोफत सुविधा मिळवून देण्यासाठी युवासेना विशेष प्रयत्न करीत आहे. निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवासेनेच्या माध्यमातून एक नवी युवा पिढी उभारी घेत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.


शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवासेनेच्या माध्यमातून एक नवा झंजावात आक्रमक होऊन आरोग्याचे प्रश्न हाती घेतले आहेत. संपूर्ण मतदारसंघात आरोग्य समस्या हा महत्त्वाचा प्रश्न असून शेवटच्या घटकापर्यंत या आरोग्य सोयी सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी या शिबिराच्या माध्यमांचे आयोजन केले असून लोकाभिमुख जनजागृती अशा शिबिरांमधून निश्चितपणे होणार आहे. युवा शिवसेनेच्या   माध्यमातून शासनाच्या आरोग्य विषयक विविध योजनांचा लाभ आरोग्य योजनेचे प्रश्न सोडविण्यासाठी या पुढील काळातील युवासेना आक्रमकपणे प्रयत्न करणार असून युवासेनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शिवसेनेला या संपूर्ण जिल्ह्यात एक नवी उभारी येत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.