
दोडामार्ग : जागतिक महिला दिनानिमित्त दोडामार्ग शहरातील पिंपळपान ग्रुपने आयोजित केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमात कोकण.. महाराष्ट्राची कला - संस्कृती तसेच राजमाता जिजाऊ, शिवछत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाची जबरदस्त 'क्रेझ' 'पहावयास मिळाली. या कार्य क्रमांसोबत आयोजित झालेल्या पाककला स्पर्धेलाही महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
येथील पिंपळेश्वर सभागृहात पिंपळपान अंतर्गत च्या पिंपळपान महिला बचत गटाने पाककला स्पर्धेत सोबत लावणी, फनी गेम्स, रेकॉर्ड डान्स,नाटीका वगैरे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शहरात नुकत्याच निधन पावलेल्या सुपरीचीत कै. मीनाक्षी उर्फ वत्सला जयवंत देसाई अर्थात वत्सला मावशी यांना श्रद्धांजली व सावित्रीबाई फुले यांच्या तसबीरी ला पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण करत दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमात सहभागी महिला कलाकारांनी कोकण, महाराष्ट्राची संस्कृती -परंपरा दर्शविणारी तसेच राजमाता जिजाऊ शिवाय शिवछत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या कार्याची महती सांगणारे अनेक बहारदार कार्यक्रम सादर केले. विशेषतः महाराष्ट्राच्या शिवकन्या व सकाळची पहाट या नृत्याने तर प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमांमध्ये मोठ्यांसोबत अनेक छोट्या बालिकांचेही नृत्यविष्कार कौतुकास पात्र ठरले.
तांदळापासून उत्कृष्ट पदार्थ या थीमवर आधारित पाककला स्पर्धेत एकूण दहा स्पर्धकांनी भाग घेतला. त्यातील सेजल गुरुदास नाईक (प्रथम), विद्या वासुदेव भावे (द्वितीय ), स्नेहा सतीश मिरकर (तृतीय )अंजली दीपक बुगडे (चतुर्थ ) या विजेत्यांसोबत फनी गेम्स मधील विजेत्यांना देखील बक्षीस देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आनंद कामत यांनी केले.