
देवगड : राज्यात सुरू असलेल्या सत्तातंराच्या विरोधात आज मनसेच्यावतीने एक सही संतापाची आंदोलन करण्यात आले. येथील तळेबाजार एसटी स्टॅन्ड भागात हे आंदोलन झाले. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबाबत नाराजी व्यक्त केली. दररोज रंग बदलणाऱ्या नेत्यांवर चीड येतेय ?...तुम्हाला गृहीत धरणाऱ्या राजकीय पक्षांवर डोकं संतापलय ?...महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा राग आलाय ?...व्यक्त व्हा...तुमच्या विभागात आयोजित *'एक सही संतापाची'* या आंदोलनात सहभागी व्हा !!! असे उद्गार या वेळी आंदोलन कर्त्यांनी मनसेच्या वतीने केले.
तसेच या ठिकाणी सर्व सामान्यांचे प्रश्न तसेच आहेत. जो तो आपापला राजकीय स्वार्थ जपत आहे. त्यामुळे मनसेने राबविलेल्या आंदोलनाचे कौतुक करण्यात आले. तसेच सायंकाळी ३ ते ६ या वेळेत शिरगाव येथे अभियानाची सांगता करण्यात येणार आहे, अशी माहिती उपस्थित मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.यावेळी संतोष मयेकर, चंदन मेस्त्री,बबलू परब, महेश नलावडे,राकेश मिराशी,शुभम कुबडे,राजा मोंडकर, प्रथमेश परब,परेश आडकर तसेच मोठ्या संख्येने मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.