
देवगड : सिंधू आरोग्य मेळावाअंतर्गत शिरगाव येथील महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून या आरोग्य शिबिरास २३५ लाभार्थ्यानी लाभ घेतलाया शिबिराचे उदघाटन भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद साटम,शिरगाव उपसरपंच संतोष कुमार फाटक, तोरसोळे सरपंच तेजस्विनी पवार, हडपिड सरपंच संध्या राणे, ओंबळ सरपंच अरुण पवार, शिरगाव ग्रामपंचायत सदस्य मंगेश थोपटे, अस्थिरोग तज्ञ डॉ.सचिन डोंगरे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. संजय विटकर, अस्थिरोग तज्ञ डॉ. निलेश पाकळे, सर्जन डॉ. विद्यादर तायशेटे, तालुका आरोग्य अधिकारी देवगड डॉ. उमेश पाटील, पंचायत समिती विस्तार आरोग्य विस्तार अधिकारी श्रीमती प्रतिभा वळंजु, वैद्यकीय अधिकारी डॉ.शितल चव्हाण, डॉ. प्रांजल वाळवे, डॉ. अमित मेस्त्री, डॉ. संघराज चव्हाण, डॉ. चित्रा पाटील, डॉ. मयुरी साटम, नेत्रचिकित्सक मारुती सावंत, शिवानी चिवटे, आदिसह आरोग्य सेविक आरोग्य सेविका उपस्थित होते. देवगड तालुक्यातील शिरगाव येथे जि. प. सिंधुदुर्ग तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय देवगड व प्राथमिक आरोग्य केंद्र शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिरगाव येथील आरोग्य केंद्रात सिंधू आरोग्य मेळावा अंतर्गत महा आरोग्य शिबिर सपन्न झाले .या शिबिरामध्ये हृदयविकार, कॅन्सर, बालरोग, स्त्रीरोग, नेत्र तपासणी, अस्थिरोग तपासणी, तसेच प्री. कॅन्सर तपासणी व सामान्य आजारांची सुमारे २३५ जणांची तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत तपासणी करण्यात आली.स्वप्नील झोरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.