कलंबिस्त मध्ये आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

Edited by: विनायक गावस
Published on: February 11, 2024 07:23 AM
views 54  views

सावंतवाडी : कलंबिस्त ग्रामपंचायत व कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित कलंबिस्त यांच्या संयुक्त विद्यमाने व कलंबिस्त हायस्कूलच्यावतीन आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात जवळपास 200 रुग्णांनी लाभ घेतला. या महाआरोग्य शिबिरात आयुष्यमान भारत कार्ड 15 जणांनी त्याचाच लाभ घेतला. या .शिबिरामध्ये जिल्हा रुग्णालयाचा तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली. या शिबिराचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले. 

रूपेश राऊळ म्हणाले कलंबिस्त गावातील लोकांची आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्याचे काम गावातील दुग्ध संस्था आणि ग्रामपंचायत एकत्र येऊन करत आहे असे कार्य खरंच महान आहे. गावच्या सर्वांगीण विकासाला आरोग्य सुदृढता हे एक महत्त्वाचे आहे अशी शिबिराच्या माध्यमातून एक सामाजिक विकास साधला जात आहे असे गौरवद्गार त्यानी काढले.

कलंबिस्त हायस्कूलमध्ये हे महाआरोग्य शिबिर संस्थेच्या सातव्या वर्धापन दिनाच औचित्य साधून घेण्यात आले. या शिबिराचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन श्री राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच सपना सावंत जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर दिगंबर करंबळेकर डॉक्टर श्याम राणे दुग्ध संस्थेचे चेअरमन एडवोकेट संतोष सावंत सचिव रमेश सावंत उपसरपंच सुरेश पास्ते ग्रामपंचायत सदस्य दीपक जाधव हनुमान पास्ते दर्शना बिडय सुप्रिया राऊळ रिया सावंत मेघा तावडे मुख्याध्यापक अभिजीत जाधव संस्थेचे संचालक दत्ताराम कदम गजानन राऊळ माजी सैनिक प्रकाश सावंत शाहू पास्ते श्री बाळाघाडी बाळा राजगे लहू राऊळ यशवंत सावंत शिक्षक शरद सावंत सौ कविटकर किशोर वालावलकर रवी कमल सावंत रवींद्र तावडेआदी  उपस्थित होते.