श्री विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ अयोजीत भजन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

Edited by: विनायक गावस
Published on: August 16, 2023 19:33 PM
views 149  views

सावंतवाडी : श्री विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ कामळेवीर बाजार पेठ, यांच्या सौजन्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त सोमवार दि. १४ ऑगस्ट 2023 तें 15 ऑगस्ट 2023 रोजी कामळेवीर विठ्ठल रखुमाई मंदिरात जिल्हास्तरीय भजन स्पर्धा, नाद भजनाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या भजन स्पर्धेचे उदघाटन श्री रुपेश कानडे, अध्यक्ष भाजप युवा मोर्चा मंडळ कुडाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेमध्ये एकूण दहा भजन मंडळानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक श्री लक्ष्मी नारायण भजन मंडळ वालावल यास श्री रुपेश कानडे.अध्यक्ष भाजप युवा मोर्चा मंडळ, कुडाळ पुरस्कृत -5001रु, द्वितीय पारितोषिक-श्री नटराज भजन मंडळ पिंगुळी यास श्री सचिन रेडकर, सामाजिक कार्यकर्ते पुरस्कृत -3001रु,तृतीय पारितोषिक-श्री विठ्ठल रखुमाई भजन मंडळ आंदुर्ले यांस सौ स्वप्ना वारंग माजी पंचायत समिती सदस्य पुरस्कृत  -2001रु, उत्तेजनार्त श्री रवळनाथ प्रा भजन मंडळ पडलोस यास -श्री रमेश वायगणकर पुरस्कृत -1001रु    तसेच वैयक्तिक  बक्षिसे -शिस्त बद्ध मंडळ,श्री भूतनाथ प्रा भजन मंडळ निरवडे यास श्री संदीप होडावडेकर पुरस्कृत 1001रु, उत्कृष्ट गायक-श्री सोमेश वेंगुर्लेकर, गोठण प्रा भजन मंडळ वजराठ यास श्री महेश वराडकर पुरस्कृत -501रु,उत्कृष्ट हार्मोनियम, श्री अजिंक्य कळंगुटकर, श्री रवळनाथ प्रा भजन मंडळ पडलोस यास -श्री अक्षय पेडणेकर  पुरस्कृत -501रु उत्कृष्ट पखवाज श्री सागर वारखंडकर श्री कलेश्वर पूर्वी प्रा भजन मंडळ वेत्ये यास - श्री सुभाष वेंगुर्लेकर पुरस्कृत -501रु, उत्कृष्ट तबला श्री प्रथमेश नाईक श्री मुसळेश्वर प्रा भजन मंडळ मळेवाड यास -श्री मंथन रेडकर यांजकडून -501रु, उत्कृष्ट कोरस- श्री सिद्धेश्वर प्रा भजन मंडळ वायगणी यास श्री प्रवीण रेडकर यांज कडून -501रु तसेच सर्व भजन मंडळाना मोहम्मद पटेल यांजकडून सन्मानचिन्ह .देण्यात आले ह्या स्पर्धेतील  बक्षीस वितरण कामळेवीर बाजारपेठ मित्र मंडळातील सदस्य ,बाजारपेठेतील महिला सदस्य, सामाजिक कार्यकर्ते सचिन रेडकर, मोहम्मद पटेल यां सर्वांच्या हस्ते सर्व विजेत्या भजनमंडळाना  पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री शार्दूल तेंडोलकर यांनी बोलताना सांगितले कि श्री विठ्ठल रखुमाई या मंदिरात भजन स्पर्धा आयोजित केल्यामुळे या मंदिराला प्रति पंढरपूरचे स्वरूपप्राप्त झाल्यासारखे वाटले यावेळी त्यांनी भजन स्पर्धेमध्ये सर्व सहभागी भजन मंडळाचे आभार मानले. याआगोदर या मंडळाने रक्तदानशिबीरासारखा जिवनोपयोगी असा उपक्रम आयोजित केला होता यालाही लोकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता. असेच समाजोपयोगी असे उपक्रम राबविणे हा आमचा मंडळाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले यावेळी या मंदिरामध्ये देश सेवेसाठी कामगिरी बजावलेले निवृत्त माजी सैनिक श्री ऊत्तम पाटकर यांचा 15 ऑगस्ट स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून या भजन स्पर्धेवेळी शाल श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित कांमळेवीर बाजारपेठ मित्र मंडळातील सर्व सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षण -श्री रुपेंद्र परब यांनी केले. तर सूत्र संचालन श्री राजेश गुडेकर यांनी केले.