तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद !

'यांनी' मारली बाजी
Edited by: विनायक गावस
Published on: November 21, 2023 19:25 PM
views 65  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सावंतवाडी तालुका पत्रकार संघ , सैनिक स्कूल आंबोली आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये अंगणवाडी गटांमध्ये प्रथम क्रमांक कनिष्क गरूड याला मोठ्या गटात श्रीराम मायप्पा पाटील तर लहान गटात प्रथम क्रमांक स्वराली आनंद हरम हिने पटकावला. विजेत्यांना भेटवस्तू प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तर सहभाग प्रमाणपत्र सर्व सहभागी 200 हून अधिक तिन्ही गटातील मुलांना प्रदान करण्यात आले.

यावेळी झालेल्या पारितोषिक वितरण समारंभास सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आंबोली सैनिक स्कूलचे सचिव सुनील राऊळ,सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, सैनिक स्कूलचे कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे,सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, सचिव मयूर चराठकर,खजिनदार रामचंद्र कुडाळकर, उपाध्यक्ष दीपक गावकर, नरेंद्र देशपांडे, उमेश सावंत, राजू तावडे ,मंगल नाईक, प्रसाद माधव आदी उपस्थित होते.


जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानामध्ये झालेल्या या रंगभरण स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले यावेळी अंगणवाडी बालगटासाठी कार्टून मिकी माऊस आणि फ्लावर्स असे चित्र दिले होते यामध्ये रंगभरण करत असताना प्रथम क्रमांक यशवंतराव भोसले किड्स केजीच्या कनिष्क  लोभस गरुड याने पटकावला तर, द्वितीय क्रमांक, सावंतवाडी माठेवाडा येथील अंगणवाडी क्रमांक १५ मधील कु.स्निग्धा स्वप्नील प्रभू, हिने तर तृतीय क्रमांक याच अंगणवाडीतील शाल्मली महादेव नेरूरकर हिने पटकावला.  इयत्ता पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांच्या छोट्या गटामध्ये  मिकी माऊस, फ्लॉवर्स चित्र देण्यात आले होते यामध्ये रंगभरण करताना, प्रथम क्रमांक सावंतवाडी मदर्स क्वीन इंग्लिश स्कूल ची की स्वराली आनंद हरम हीने प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक स्टिपिंग स्टोन ग्लोबल स्कूल सावंतवाडी येथील राधिका विनायक शेटकर हिने पटकावला तर सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळा नंबर 2 ची विद्यार्थिनी कु दूर्वा अजित सावंत तृतीय क्रमांक पटकावला 

या स्पर्धेमध्ये  इयत्ता पाचवी ते सातवी मोठा गटाला देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि जहाजावरील लहानगा कॅप्टनचे देण्यात आले होते या स्पर्धेत उत्तम रंगभरण करत प्रथम क्रमांक सावंतवाडी मिलाग्रिस स्कूल च्या सातवीतील विद्यार्थी श्रीराम मायप्पा पाटील यांने पटकावला. तर द्वितीय क्रमांक मिलाग्रिस स्कूल सावंतवाडीचा इयत्ता पाचवीचा  विघ्नेश मनोज सावंत याने पटकावला तर तृतीय क्रमांक कळसूलकर इंग्लिश स्कूल मधील इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी वेणू अजित सावंत हिने पटकावला बाल दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये मोठा प्रतिसाद लाभला यावेळी माझी वसुंधरा या अंतर्गत सावंतवाडी नगर परिषदेचे उद्यान अधिकारी गजानन सावंत यांनी छोट्या मुलांसह त्यांच्या पालकांना स्वच्छतेची शपथ दिली वसुंधरेची स्वच्छता ठेवण्याबाबत हात पुढे करून शपथ दिली. या स्पर्धेचे परीक्षण मिलाग्रीस हायस्कूलचे कलाशिक्षक गिरीश डिचोलकर, महिला पत्रकार वैशाली खानोलकर, पत्रकार आणि प्रा. रुपेश पाटील यांनी केले.

या कार्यक्रमास शैलेश मयेकर, साबाजी परब,  माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर राजेश मोंडकर, आंबोली सैनिक स्कूलचे प्राचार्य एन डी गावडे, दिव्या वायंगणकर आदीसह राणी पार्वती देवी हायस्कूल, कळसूलकर इंग्लिश स्कूल, यशवंतराव भोसले किड्स, कळसूलकर इंग्लिश स्कूल, माठेवाडा येथील सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळा नंबर दोन,माठेवाडा अंगणवाडी क्रमांक 15, स्टेपिंग स्टोन इंग्लिश स्कूल, शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल, उर्दू इंग्लिश स्कूल, बांदा प्राथमिक शाळा, तळवडे प्राथमिक शाळा ओटवणे प्राथमिक शाळेतील शिक्षक पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.