
सावंतवाडी : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग, ओरोस पोलीस 'सडक सुरक्षा - जीवन रक्षा', सावंतवाडी पोलीस स्टेशन व रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ३३ व्या रस्ता सुरक्षा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमा अंतर्गत रस्ता सुरक्षा उजव्या बाजूने चालण्याची जनजागृती करण्यात आली. तसेच जेणेकरून अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी हेल्मेटचा वापर करणे याबद्दल रोटरी क्लबकडून जनजागृती करण्यात आली.
यावेळी रोटरी क्लब तर्फे जनरल चेक कॅम्पचेही आयोजन करण्यात आले होते. यासाठी सावंतवाडी आयुर्वेदिक कॉलेज यांचे सहकार्य लाभले. सुमारे १०० हून अधिक लोकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
यावेळी आयुर्वेदिक कॉलेजचे एनएसएसचे प्रमुख कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. जयराम मरकड, डॉ. सचिन उपनवर, डॉ. वैभव राजवण, डॉ. शिवानी सिंह, डॉ. ऋषिकेश सातपूते, डॉ. ऋतिका रासकर यांचे सहकार्य लाभले तर कार्यक्रमाचे आयोजक रोटरी क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. विनया बाड, सेक्रेटरी रो. प्रमोद भागवत, रो. सुहास सातोस्कर, रो. काशिनाथ दुभाषी यांच्यामुळे या उपक्रमाचा सर्वांना लाभ घेता आला.
या कार्यक्रमासाठी सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, नंदकिशोर काळे, उप प्रादेशिक परिवहन सिंधुदुर्ग अधिकारी जावेद शिकलगार, विजयकुमार अकमवार, सचिन पोलाद, संजय केरकर, अभिजीत शिरगावकर, गणेश जाधव, प्रकाश गावडे , संदीप चव्हाण, रुपेश रसाळ, जगदीश राऊळ, बच्चू कन्याळकर, ट्राफिक पोलीस राजाराम राणे, सुनील नाईक, अजित सांगेलकर व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव आदि उपस्थित होते.