देवगड मनसेच्या भजन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 24, 2024 14:22 PM
views 71  views

देवगड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना देवगड तालुका यांच्या वतीने भजन स्पर्धा नुकतीच पार पडली. अयोध्या येथील श्री राम मंदिर उद्घाटन यानिमित्त देवगड मनसेतर्फे श्री बाळूमामा मंदिर कोंडामा येथे भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या भजन स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. 

 मनसे देवगडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक - बुवा श्री. अतुल मेस्त्री,श्री.काळंबादेवी प्रासादिक भजन मंडळ - चांदेलवाडी कुणकेश्वर. द्वितीय क्रमांक - बुवा श्री.सुशांत जोईल,श्री.महापुरुष प्रासादिक भजन मंडळ,कातवण. तृतीय क्रमांक - बुवा श्री.रविकांत घाडी,श्री.पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, चांदेलवाडी कुणकेश्वर उत्तेजनार्थ बक्षीस - बुवा श्री.शुभम कावले,श्री.स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ,कावलेवाडी जामसंडे. उत्कृष्ट हार्मोनियम वादन - श्री.हर्ष राणे,श्री.देव ठीकाणदार प्रासादिक भजन मंडळ. उत्कृष्ट झांज वादन - श्री.प्रदीप राणे,श्री.ठीकाणदार प्रासादिक भजन मंडळ वरेरी उत्कृष्ट पखवाज वादक -श्री.अक्षय मेस्त्री,श्री.भगवती देवी प्रासादिक भजन मंडळ,मुणगे. उत्कृष्ट कोरस,श्री.भावई देवी प्रासादिक भजन मंडळ,वरेरी शिस्तबद्ध मंडळ - अभय जाधव,श्री.हनुमान प्रासादिक भजन मंडळ,देवगड कील्ला. उत्कृष्ट गायन - श्री.अभिषेक नाणेरकर,श्री.समर्थ प्रासादिक भजन मंडळ, कुणकेश्वर आदींनी यश प्राप्त केले. 

 यावेळी  मनसे तालुकाध्यक्ष  संतोष मयेकर, महिला उपाध्यक्ष स्वाती सावंत , विभाग प्रमुख  आर्पिता राघव, सुहासिनी प्रभू, शीतल जाधव, शिवानी जाधव, महेश नलावडे, प्रविण सावंत, बाळूमामा देवस्थान अध्यक्ष बबन बोडेकर,बाळूमामा देवस्थान उपाध्यक्ष संजय बोडेकर,  देवगड भजन मंडळ संघटना उपाध्यक्ष गुणाजी कोयंडे , देवगड भजन मंडळ संघटना सचिव आनंद धुवाळी महेश पाटील ,येंडे सर,श्री.सिद्धार्थ जाधव तळवडे शाखाध्यक्ष, श्री.मनोज तांबे वानिवडे शाखाध्यक्ष,  मनविसे माजी उपजिल्हा अध्यक्ष श्री. अनिकेत तर्फे, मनविसे माजी संपर्क अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर मोरे, श्री.बबलू परब,श्री.प्रविण मयेकर,श्री.राजू कोतेकर, प्रथमेश परब,नयन घाडीगांवकर,संगीत विशारद श्री विश्वास प्रभुदेसाई ( किंजवडे ) केदार परब आदी सह मनसैनिक व भजन प्रेमी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.