सावंतवाडीतील महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Edited by: विनायक गावस
Published on: June 27, 2023 12:12 PM
views 134  views

सावंतवाडी : जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान व अथायु मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यामाने रविवार दिनांक 25 जून रोजी आरोग्य शिबीर माठेवाडा श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स येथे भरवण्यात आले ह्या महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ श्रीफळ वाढवून जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

शुभारंभाच्या प्रसंगी अथायु मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल येथील डॉक्टर मुळीक मार्केटिंगचे मॅनेजर माननीय मदन गोरे वर्षा कानेटकर तसेच तळवडे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पडते सुनील कोरगावकर स्नेहदीप हॉटेलचे मालक मनोहर जगताप गवळी सामाजिक कार्यकर्ते सुनील केळुसकर विठ्ठल मंदिरातील पुजारी प्रमोद भागवत इत्यादी या महाआरोग्य शिबिराला उपस्थित होते.

यावेळी महा आरोग्य शिबिरात येणाऱ्या रुग्णांना कैलासवासी माठेवाडा येथील नाटेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू  विशाल पवार यांच्या कुटुंबियांच्या मार्फत चहा पाण्याचा कार्यक्रम येणाऱ्या रुग्णांना देण्यात आला. यावेळी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी आपल्या भाषणामध्ये महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया जेवण औषधे महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत रुग्णांना लाभ घेता येतो. यामध्ये अथायू मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर विमानतळ शेजारी हायवे नजीक या रुग्णालयांमध्ये मोफत हृदयाची शस्त्रक्रिया बायपास सर्जरी एन्जोप्लास्टीक हृदयाला पेस मेकर बसवणे हृदयाच्या वॉलची शस्त्रक्रिया कॅन्सरची शस्त्रक्रिया मेंदूची व मणक्याची शस्त्रक्रिया ढोपराच्या  पाठीमागेल लिगामेंट्सची शस्त्रक्रिया ढोपराची ऑर्थोस्कोपीकची शस्त्रक्रिया दुर्बीण द्वारे मुतखड्याची शस्त्रक्रिया व दुर्बीण द्वारे प्रोस्टेल शस्त्रक्रिया या रुग्णालयामध्ये रुग्णांना महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना अंतर्गत मोफत केली जाते. यासाठी पिवळे केशरी रेशन कार्ड तसेच आधार कार्ड रुग्णांकडे असणे आवश्यक आहे.


गेल्या पाच वर्षांमध्ये माझ्या जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान मार्फत हजारो रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया या रुग्णालयामध्ये जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या मार्फत करण्यात आल्या त्या रुग्णालयाचे नेहमी सहकार्य व दिलासा रुग्णांना मिळते.  गेले चार-पाच वर्षे मी सावंतवाडी येथे आरोग्य शिबिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना शासनाच्या सुविधा मोफत लाभ घेण्यासाठी हे रुग्णसेवा करण्यात आली. तसेच जिल्ह्यात गेल्यावर्षी कुडाळ कणकवली देवगड मालवण दोडामार्ग व सावंतवाडी अशा विविध ठिकाणी आरोग्य शिबिर भरवून दिलासा देण्याचे कार्य सिंधुदुर्गातील जनतेला आता अथायु मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजु मसूरकर यांनी सिंधुदुर्ग वासियांना च्या रुग्णांना दिलासा आहे. 


तसेच रुग्णांना रुग्णालयामार्फत सावंतवाडी व विविध जिल्ह्यातील तालुक्यातील रुग्णांना बस सेवा कोल्हापूर येथे जाण्यासाठी रुग्णालय मार्फत नेहमी देत आहेत याचा लाभ रुग्णांनी घेतला आहे.  सावंतवाडी येथे महाआरोग्य शिबिराला जिल्ह्यातील 132 रुग्णांनी लाभ घेऊन त्यामध्ये ७२ रुग्णांची शस्त्रक्रिया विविध आजारावरील शस्त्रक्रिया आता अथायु मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्यामार्फत होणार आहे.