सावंतवाडी माठेवाड्यातील महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Edited by: विनायक गावस
Published on: September 06, 2023 16:23 PM
views 45  views

सावंतवाडी : सावंतवाडी माठेवाडा आत्मेश्वर मंदिर नजीक श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स येथे महाआरोग्य शिबिर जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान व अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर हायवे नजीक विमानतळ शेजारी यांच्या संयुक्त विद्यामाने हे महाआरोग्य शिबीर भरविण्यात आले होते. या शिबिराच जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून या शुभारंभ करण्यात आला. 

अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूरचे डॉ. सुदेश कुमार मुळीक मार्केटिंग मॅनेजर मदन गोरे दिनेश डावरे कॅम्प संयोजक डॉ. मयूर जाधव दिग्विजय पाटील पी.आर.ओ विवेक चव्हाण पी.आर.ओ अमोल फाले पी.आर.ओ मा. सुनील कोरगावकर मा. विजय हेरेकर कु. वैष्णवी बोंद्रे गुरुनाथ कोरगावकर प्रशांत पडते मनोहर जगताप गवळी वगैरे मान्यवर या शिबिराच्या शुभारंभाला उपस्थित होत.

तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व सावंतवाडी तालुक्यातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक बहुसंख्येने उपस्थितीत होते‌. यामध्ये जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजनेअंतर्गत गेली दहा वर्षे माझ्या मार्फत हजारो संख्येने रुग्णांना आरोग्य योजनेचा मोफत लाभ घेऊन विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया औषधे व जेवण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना मोफत लाभ घेतला आहे. त्यामध्ये हृदयाची शस्त्रक्रिया एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी हृदयाला वॉल बसवणे पेसमेकर बसवणे तसेच हृदयाला छिद्र असणे कॅन्सरची शस्त्रक्रिया मणक्याची व मेंदूची शस्त्रक्रिया गुडघ्याचे ऑर्थोस्कोपी गुडघ्यांच्या पाठीमागील लिगामेन्टची शस्त्रक्रिया विविध प्रकारच्या हाडांची शस्त्रक्रिया मुतखडा व प्रोस्टेल शस्त्रक्रिया अशा विविध प्रकारचे शस्त्रक्रिया या कोल्हापुर अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये राजू मसूरकर यांच्यामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध रुग्णांनी या योजनेचा अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये लाभ मोफत घेतला आहे. यावेळी 77 रुग्णांनी लाभ घेऊन 38 रुग्णांनी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी दुसऱ्या दिवशी अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटलच्या बस सेवेने पाठवण्यात आले आहे.