हेल्प फाउंडेशनच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: May 21, 2024 15:52 PM
views 264  views

वेंगुर्ला : हेल्प फाउंडेशन कोचरा चव्हाटाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सामाजिक जाणिवेचे भान ठेवून हेल्प फाऊंडेशन कोचरा चव्हाटा व राज्य रक्तसंक्रमण परिषद महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने 16 मे रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षक श्री हंजनकर यांच्या हस्ते श्री चव्हाटा चरणी श्रीफळ वाढवून करण्यात आले. ह्या शिबिरात युवा रक्तदात्यांनी रक्त देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. ह्या शिबिरासाठी प्रकाश तेंडोलकर यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार हेल्प फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मानले.

हे शिबिर यशस्वी होण्यासाठी डॉक्टर मोहन बिडकर प्रांजल परब, मयुरी शिंदे, ऋतुजा हरमलकर, नितीन गावकर नंदकुमार आडकर यांची मदत झाली. त्याबद्दल हेल्प फौंडेशनच्या वतीने ज्येष्ठ नागरिक रामदास हंजनकर, सूर्यकांत हंजनकर विलास हंजनकर, रोशन हंजनकर, यांनी त्यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. ह्या शिबिरासाठी संतोष तेली, यश राऊत हंजनकर, बाबू हंजनकर यांनी वस्तुरुप देणगी देऊन मदत केली. त्याबद्दल त्यांचेही आभार हेल्प फाउंडेशनच्या वतीने मानण्यात आले. शिबिर यशस्वी होण्यासाठी हेल्प फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.