कणकवली नगरपंचायत आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

नियमित २०० ते २५० महिलांची केली जातेय आरोग्य तपासणी
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 13, 2022 21:19 PM
views 131  views

कणकवली : कणकवली नगरपंचायत व आरोग्य विभाग यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कणकवली शहरातील आरोग्य तपासणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात नियमित २०० ते २५० पर्यंत महिलांची आरोग्य तपासणी केली जात आहे.

कणकवली शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नेमून दिलेल्या जागी ही शिबिरे घेण्यात येत आहेत. कणकवली शहरातील महिलांमधून देखील या शिबिराबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच या शिबिराच्या निमित्ताने कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आवश्यकतेप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व महिलांना मोफत कॅल्शियमच्या गोळ्यांचे देखील मोफत वाटप केले. कणकवली नगरपंचायत व उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने संयुक्तरीत्या हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या पुढाकारातून महिलांना मोफत औषधी पुरवठा केल्याने महिलांमधून देखील या उपक्रमाबद्दल कौतुकउद्गार काढण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महिलांशी संवाद साधत त्यांची विचारपूस देखील केली.

यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, भाजपाचे शहराध्यक्ष अण्णा कोदे, डॉ. सचिन वुईके, डॉ. सुहास पावसकर, डॉ. निलेश पेंडूरकर. डॉ. सूरज कुडतरकर, डॉ. तस्लिमा शेख, डॉ. आबदार, डॉ. कदम, सरस्वती नर्सिंग कॉलेज स्टुडंट, उपजिल्हा रुग्णालय स्टाफ श्रीम. नुपूर पवार, नयना मुसळे, श्रीम. चोडणकर, एल बी. गोसावी, श्रीम. सारिका, विद्या शिर्के, श्रीम. सावंत, श्रीम. नेहा, वैभव फाले, अभिजीत फाले, श्री. चाळके, श्री. चौरे, पी. सी. बुचडे आदी उपस्थित होते. यापुढे कणकवली शहरात आयोजित केलेल्या शिबिरांमध्ये देखील महिलांनी देखील सहभागी व्हावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.