कलंबिस्त इथं आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कै. यश विर्नोडकर स्मृती प्रित्यर्थ आयोजन
Edited by:
Published on: February 26, 2025 18:33 PM
views 198  views

सावंतवाडी : कै. यश विर्नोडकर स्मृती प्रित्यर्थ कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यवसायिक संस्था, ग्रामपंचायत कलंबिस्त हायस्कूल व भांडुप येथील विजय क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरामध्ये दीडशेहून अधिक जणांची तपासणी करण्यात आली. या भागात नेत्र आजार समस्या अधिक असल्याचे शिबिरातून निदर्शनास आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजू विर्नोडकर यांनी कलंबिस्त सैनिकी परंपरा असलेल्या या गावात आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. येत्या काळात निश्चितपणे कायमस्वरूपी आरोग्य शिबिर भरवले जाईल. आरोग्य दृष्ट्या हा गाव सुदृढ बनवण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व संस्था प्रयत्न करू असे त्यांनी स्पष्ट केले. कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यवसायिक संस्थेने सातत्याने या भागातील शेतकरी सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य व सामाजिक समस्या संदर्भात तसेच कृषी पशुसंवर्धन संदर्भात जे उपक्रम राबवत आहे ते वाखाडण्याजोगे आहेत अशा शब्दात कलंबिस्त स्कूलचे संस्थेचे अध्यक्ष शिवाजी सावंत यांनी गौरोद्गार काढले. 

कलंबिस्त हायस्कूल येथे मोफत नेत्र तपासणी व सर्व आजार याविषयी मार्गदर्शन व तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष शिवाजी सावंत व सामाजिक कार्यकर्ते संजू विर्नोडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कलंबिस्त दुग्ध संस्थेचे चेअरमन अँड. संतोष सावंत, सरपंच सपना सावंत, उपसरपंच सुरेश पास्ते, मुख्याध्यापक अभिजीत जाधव, राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष तळवणेकर, कल्याण कदम, भांडुप येथील विजय क्रीडा मंडळाचे संतोष कासले,  संचालक सूर्यकांत उर्फ बाळा राजगे. डॉ ए  एस. यादव, डॉ.दत्तकुमार कोयंडे, डॉ कांचन विर्नोडकर, डॉक्टर प्रथमेश पै, डॉक्टर प्रार्थ पै, दुग्ध संस्थेचे संचालक दत्ताराम कदम, सचिव रमेश सावंत, प्रकाश तावडे, दीपक विर्नोडकर, प्रशांत विर्नोडकर, ग्रामपंचायत सदस्य सौ रिया सावंत, दीपक जाधव . सौ अर्चना सावंत ज्येष्ठ ग्रामस्थ अनिल सावंत दिनेश सावंत श्री.पांगम, गुरुप्रसाद सावंत पांडुरंग सावंत आदी उपस्थित होते

दुग्ध संस्थेचे चेअरमन अँड. संतोष सावंत यांनी कलंबिस्त भागातील शेतकरी वर्ग तसेच सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी ही संस्था नेहमी कार्यरत आहे. या भागा त तरुण-तरुणींना पशुसंवर्धनाच्या माध्यमातून त्यांच्या हाताला काम देण्याचा आमचा मानस आहे.त्याचबरोबर येथील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आम्ही सातत्याने आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जनजागृती करत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन शिक्षक किशोर वालावलकर व आभार मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी मानले. या शिबिरामध्ये, नेत्र तपासणी योगा पंचक्रमाविषयी डॉक्टर प्रथमेश पै व डॉक्टर प्रथा पै यांनी विद्यार्थ्यांना व नागरिकांना योगा व पंचक्रमाविषयी व आरोग्य विषयी मार्गदर्शन केले. तर डॉक्टर ए एस यादव, डॉदत्तकुमार कोयंडे, डॉक्टर कांचन विर्नोडकर यांनी इतर आजारावर रुग्णांची तपासणी केली. या शिबिरामध्ये चष्माचे वाटपही करण्यात आले. डोळ्यांचे आजार रुग्णांमध्ये अधिक आढळले पुढील काळात या भागात खास विशेष नेत्र तपासणी घेऊन येतील गोरगरीब शेतकऱ्यांना आरोग्याची निगा राखण्याबद्दल विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे असे स्पष्ट करण्यात आले. जवळपास दीडशेहून अधिक जणांनी या शिबिराचा लाभ घेतला.