
दोडामार्ग : नगरपंचायत कसई दोडामार्ग आणि फार्मास्युटिकल्स लिमिटेड व व्यंकटेश आयुर्वेदिक औषधालय दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व चिकीत्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात डॉ. भार्गवी मेस्त्री, डॉ. वसुधा मेस्त्री यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. जयेश सामंत यांनी केले. या आरोग्य शिबिराचा एकूण २१० नागरिकांनी लाभ घेतला. शिबिराच्या उ्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी नगरसेवक संतोष म्हावळणकर उपस्थित होते.
उपस्थितांना नगराध्यक्ष यांनी आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आपले अनमोल जीवन निरोगी बनवावे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शिरोडकर यांनी केले. यावेळी वसीम खाटीक प्रशासकीय कर्मचारी नगरपंचायत कसई दोडामार्ग, अभिषेक नेमाणे स्थापत्य अभियंता कसई दोडामार्ग, सुरेखा ताटे, लिपिक कसई दोडामार्ग नगरपंचायत, वर्षा गवस लिपिक कसई दोडामार्ग नगरपंचायत, प्रबोधन मठकर स्थापत्य अभियंता (अभि.सेवा) नगरपंचायत कसई दोडामार्ग तसेच नगरपंचायत कर्मचारी सूर्यनारायण गवस, सिद्धेश शेगले, प्रमोद कोळेकर, प्रणाली शेटकर, आदी कर्मचारी तसेच व्यंकटेश गवस उपस्थित होते.