आदित्य हळदणकर मित्रमंडळ वेंगुर्ला आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Edited by: दिपेश परब
Published on: August 29, 2023 20:31 PM
views 145  views

वेंगुर्ला : येथील आदित्य हळदणकर मित्रमंडळ वेंगुर्ला यांच्या वतीने आज मंगळवार दि २९ ऑगस्ट रोजी समर्थ आदित्य हळदणकर याच्या ६ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सलग ६ व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन बॅ बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय  वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी या शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला तर यात महिला रक्तदात्यांचा सहभाग लक्षवेधी होता.

   या रक्तदान शिबिराचे उद्घाटन वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पारितोष कंकाळ, श्रीमती सुप्रिया सुभाष हळदणकर, खर्डेकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य विलास देऊलकर, प्रा. आरोलकर सर, प्रा.नाईक, सुरेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेचे गोवा समन्वयक संजय पिळणकर, राजेश पेडणेकर, भूषण मांजरेकर, यश किनळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

   रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी शिव केरकर, पीटर डीसोजा, निलेश गवस, अमित म्हापणकर, अमित नाईक, सौरभ धुरी, विल्सन डीसोजा, सचिन मांजरेकर, भक्ती हळदणकर, श्रुती मयेकर आदींनी परिश्रम घेतले.