कै. प्रकाश परब मित्रमंडळ व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झालं उद्घाटन
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 27, 2022 15:14 PM
views 142  views

सावंतवाडी : तळवडे येथे कै. प्रकाश परब यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून कै. प्रकाश परब मित्रमंडळ व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान,सावंतवाडी यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, माजी जि.प.अध्यक्ष सतीश सावंत, संजय पडते, माजी पं. समिती सभापती पंकज पेडणेकर, बाळा गावडे, ठाकरे गटाचे सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख गणेशप्रसाद गवस, बाबू कुडतरकर, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, एकनाथ चव्हाण,बाबली गवंडे, सिद्धार्थ पराडकर आदी उपस्थित होते.