कोकणसाद LIVEच्या नाटळमधल्या पैठणीच्या मानकरी ठरल्या संजना सावंत

Edited by: जुईली पांगम
Published on: October 21, 2023 18:34 PM
views 289  views

कणकवली : नवरात्रीनिमित्त कोकणचं नं. 1 महाचॅनेल कोकणसाद LIVE आणि दै. कोकणसादच्यावतीने महिलांसाठी 'खेळ पैठणीचा' या खास कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. विल्बर्ट प्रोपार्टी प्रायोजित आणि कॅमलिन सहप्रायोजित हा कार्यक्रम होतोय. कणकवलीतल्या नाटळमधील गांगो माऊली मंदिरात 20 ऑक्टोबरला हा कार्यक्रम पार पडला. संजना सावंत, शरयू नार्वेकर, समीक्षा घाडीगावकर मानकरी ठरल्या.


नवरात्रीनिमित्त कोकणचं नं. 1 महाचॅनेल कोकणसाद LIVE आणि दै. कोकणसादच्यावतीने महिलांसाठी 'खेळ पैठणीचा' हा खास कार्यक्रम सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य नाटळ गावात पार पडला. विल्बर्ट प्रोपार्टी प्रायोजित आणि कॅमलिन सहप्रायोजित तर कै. सौ. अपर्णा अनिल सावंत, खांदारवाडी नाटळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, गांगो माऊली मंदिर नाटळ यांचा विशेष सहकार्याने याच आयोजन करण्यात आलं होतं. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या खेळ पैठणीला मिळाला. हटके खेळ आणि गमती जमती यामुळे एकच धमाल उडाली. पैठणीसाठीची चुरस उत्तरोत्तर वाढत गेली. 70 वर्षांच्या आजींचा सहभाग कौतुकाचा विषय ठरला.

पहिल्या क्रमांकासाठी बाजी मारली संजना सावंत यांनी. त्यांना सुंदर पैठणी आणि प्रमाणपत्र देत कोकणसाद LIVEच्या संपादिका देवयानी वरसकर यांच्या हस्ते गौरविण्यात आलं. दुसरा क्रमांक पटकावलेल्या शरयू नार्वेकर यांना पैठणी आणि प्रमाणपत्र देत ग्रामसेवा संघाच्या अध्यक्षा कविता सावंत यांनी सन्मानित केलं.  तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या समीक्षा घाडीगावकर यांनाही पैठणी आणि प्रमाणपत्र देत कोकणसाद LIVEच्या अँकर जुईली पांगम यांच्या हस्ते गौरविण्यात आलं. 

कोकणसाद LIVEच्या संपादक देवयानी वरसकर यांनी सहभागी आणि ग्रामसेवा संघाच्या अध्यक्षा कविता सावंत यांच्या विशेष सहकार्यासाठी आभार मानले. यावेळी कणकवली करस्पाँडंट उमेश बुचडे, आय हेड विद्धेश धुरी, अनिकेत नार्वेकर, कॅमेरामन प्रसाद कदम, साहील बागवे उपस्थित होते.