'थाळी कष्टकऱ्यांची' उपक्रमाला चौथ्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

समीर नलावडे मित्र मंडळाचं आयोजन ; राजू गवाणकर यांच्या वाढदिवसाचंनिमित्त
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 21, 2023 17:27 PM
views 92  views

कणकवली : कणकवली शहरात समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या  "थाळी कष्टकऱ्यांची" पंगत आपलेपणाची या मोफत जेवण वाटपाच्या उपक्रमाच्या उद्घाटना नंतर या उपक्रमाला विविध स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाच्या चौथ्या दिवशी कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते व सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यकारणी सदस्य हर्षल उर्फ राजु गवाणकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त या कष्टकऱ्यांच्या थाळी साठी स्पॉन्सर करत आपला वाढदिवस कष्टकऱ्यांसोबत साजरा केला.

कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते केक कापून कष्टकऱ्यांच्या उपस्थितीत हा वाढदिवस साजरा करण्यात आला. कणकवली पटवर्धन चौक येथे याकरिता मोठ्या प्रमाणावर कष्टकऱ्यांच्या थाळीकरता गर्दी झाली होती. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,  माजी गटनेते संजय कामतेकर, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, जिल्हा व्यापारी संघाचे उपाध्यक्ष महेश नार्वेकर, कंजूमर सोसायटीचे चेअरमन संदीप नलावडे,महेश सावंत, अनिल पवार, जावेद शेख, राजा पाटकर, पंकज पेडणेकर, सचिन कुवळेकर,  राज नलावडे, ऋतिक नलावडे यांच्यासह अन्य उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी श्री गवाणकर यांना शुभेच्छा दिल्या.