SPK त ५ ऑगस्टला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Edited by: विनायक गावस
Published on: August 04, 2023 20:27 PM
views 379  views

सावंतवाडी : श्री पंचम खेमराज महाविद्यालयात 5 ऑगस्ट रोजी  दुपारी 2 वाजता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा व तलाठी भरती मार्गदर्शन  शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

मल्टी स्किल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर सिंधुदुर्ग आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त  विद्यमाने आम्ही अधिकारी होणारच ही  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा व तलाठी भरती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे .

या कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थान  सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारकमंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत  भोंसले भुषविणार  आहेत.

कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक प्रा. अमेय सुनील महाजन सहाय्यक प्राध्यापक व समन्वयक कीर्ती महाविद्यालय, मुंबई हे मार्गदर्शन करणार आहेत.तरी ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल व तलाठी परीक्षेसाठी प्रविष्ट व्हायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.